चेक जमा करण्यासाठी मागितली लाच; सीओ विरोधात लाचलुपत विभागाची कारवाई

कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कंट्रक्शन Tirupati construction यांच्या खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम मागितली.
CO विरोधात लाचलुपत विभागाची कारवाई
CO विरोधात लाचलुपत विभागाची कारवाईभारत नागणे

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ दिगंबरराव वडजे यांच्या विरोधात एक लाख 26 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज ही कारवाई केली आहे. (Bribe demanded for deposit of check; Bribery department action against CO)

डॉ. विश्वनाथ वडजे हे माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ((CO of Malshiras Nagar Panchayat)) म्हणून कार्यरत असून तक्रारदारांनी माळशिरस येथील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कंट्रक्शन यांच्या खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम मागितली होती. याबाबत 30 सप्टेंबर रोजी तक्रारदारांनी सांगली‌ येथील अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) कडे तक्रार दाखल केली.

CO विरोधात लाचलुपत विभागाची कारवाई
Sharad Pawar : ...तर महापालिकेच्या आगामी निवडणूका स्वबळावरती लढू - शरद पवार

तक्रारीनुसार 30 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर रोजी ब्युरोच्या कार्य प्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता, कारवाईमध्ये CO वडजेंकडे चेक जमा करण्याच्या बदल्यात 1 लाख रुपये व नवीन काम मिळवून देण्यासाठी 26 हजार असे एकूण 1 लाख 26 हजार रुपयाची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर रोजी वडजे यांच्या विरुद्ध सापळा रचून कारवाई करण्यात आली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com