राजगुरुनगरात टोळीयुद्ध भडकले; राहूल वाडेकरला संपवलं

Rahul Wadekar
Rahul Wadekar

राजगुरुनगर (जि. पुणे) : राजगुरुनगर येथील तडीपार गुंड राहूल उर्फ पप्पू वाडेकर rahul wadekar याच्यावर गाेळीबार करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास राजगुरुनगर येथील पाबळ रोडवर घडली आहे. (breaking-news-gang-shoots-rahul-wadekar-died-in-rajgurunagar-police-investigating)

राहूल हा तडीपार असताना ताे मध्यरात्री राजगुरुनगर शहरात प्रवेश करीत हाेता. त्यावेळेस त्याच्यावर हल्ला झाला.

जुन्या गुन्हेगारीच्या वादातुन राहूलवर गाेळीबार झाल्याची प्राथमिक माहिती व अंदाज राजगुरुनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपासासाठी पाेलिसांनी चक्रे गतीमान केली आहेत. वर्चस्वसाठी गुंडांच्या टाेळ्या पुन्हा राजगुरुनगरला सक्रिय झाल्या की काय असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com