रस्त्याच्या कामासाठी भाजप-सेनेच्या आमदारांची शिफारस; गुन्हा पालकमंत्र्यावर

तीन कामांची शिफारस भाजप खासदार व आमदारांनी तर एका कामाची शिफारस शिवसेना आमदारांनी जिल्हा नियोजन समितीकडे केल्याचे उजेडात आले आहे.
Akola News
Akola NewsSaam Tv

अकोला - रस्त्याच्या कामात अपहार झाल्याचा आरोपाखाली न्यायालयाच्या आदेशानुसार पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र ज्या रस्त्याच्या कामात गुन्हे दाखल करण्यात आलेत त्या रस्त्याची कामांची शिफारस भाजप-सेनेच्या आमदारांनी केली आहे. त्यामुळे कामे भाजप (BJP) सेनेची आणि मनस्ताप प्रहारच्या पालकमंत्र्यांना अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे देखील पाहा -

तीन कामांची शिफारस भाजप खासदार व आमदारांनी तर एका कामाची शिफारस शिवसेना आमदारांनी जिल्हा नियोजन समितीकडे केल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे राज्यस्तरावर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय संघर्ष सुरू असला तरी अकोल्यात मात्र भाजप आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कामांबाबत तरी दुरावा नसल्याचे दिसून येत आहे.

Akola News
राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज फैसला? मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी

अकोट तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी पत्र दिले होते. तर बाळापूर तालुक्यातील एका कामासाठी सेना आमदार नितीन देशमुख यांनी पत्र दिले होते. या दोघांनीही आपल्या मतदारसंघातील कामे व्हावी यासाठी शिफारस केली होती. मात्र आता याच प्रकरणाने पालकमंत्री बच्चू कडू यांना अडचणीत आणले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com