"काय खरं आणि काय खोटं हे समोर आलं पाहिजे"; 'ज्ञानवापी'वर खासदार साक्षी महाराजांची प्रतिक्रिया

BJP MP Sakshi Maharaj : ज्ञानवापी प्रकरणावर भाजप खासदार साक्षी महाराज यांनी भाष्य केलं आहे.
BJP MP Sakshi Maharaj
BJP MP Sakshi MaharajSaam Tv

नाशिक : ज्ञानवापी प्रकरणावर आज वारणसीच्या (Varanasi ) जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणावर भाजप खासदार साक्षी महाराज यांनी भाष्य केलं आहे.'काही जण ज्ञानवापीच्या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न करत आहे. काय खरं आणि काय खोटं आहे हे समोर आले पाहिजे अशा मताचं आमचं सरकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप (BJP ) खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj ) यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये (Nashik ) पत्रकारांशी बोलत होते. ( BJP MP Sakshi Maharaj Reaction On Gyanvapi Mosque Case )

हे देखील पाहा -

भाजप खासदार साक्षी महाराज म्हणाले, 'काही जण ज्ञानवापीच्या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न करत आहे.काय खरं आणि काय खोटं आहे हे समोर आले पाहिजे अशा मताचं आमचं सरकार आहे. सत्य तुम्ही फार काळ लपवू शकत नाही. पूर्ण जगात ज्या ठिकाणी शिवाच मंदिर आहे, त्या ठिकाणी नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते. त्यामुळे काशीमध्ये देखील नंदीची तपश्चर्या सफल झाल्याचे वाटते आहे, अशी प्रतिक्रिया खासदार साक्षी महाराज यांनी दिली. पुढे साक्षी महाराज म्हणाले, 'मुस्लिम धर्मगुरूंनी देखील सांगितले आहे की, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू,हेच देखील सगळ्यांच्या हिताचे देखील आहे, असंही साक्षी महाराज म्हणाले.

BJP MP Sakshi Maharaj
सेनेने संभाजीराजेंचा अपमान केला, सत्तेचा माज शिवप्रेमी उतरवतील : मराठा क्रांती माेर्चा

दरम्यान, साक्षी महाराजांनी ताज महल प्रकरणावरही भाष्य केलं. साक्षी महाराज म्हणाले, 'ताज महल हा विषय हिंदू किंवा मुस्लिमांचा नाही, तर हा विषय भारतावर अतिक्रमण करणारे आणि भारत यांच्या मधला आहे. ज्यांनी भारतावर आक्रमण केले त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचे दोघांचे नुकसान केले. त्यामुळं हा विषय अतिक्रमण करणारे आणि भारताचा आहे. जे लोक अरबमध्ये एक भिंत उभी करू शकले नाही ते आपल्या देशात त्यांचा ध्वज काय फडकवणार', अशी प्रतिक्रिया साक्षी महाराज यांनी दिली.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com