'...त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार नाही'

'काँग्रेसला पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठता याच्या बद्दल काही घेणंदेणं नाही. काँग्रेस ही गद्दारांची फौज असून काँग्रेसमध्ये हे घडणारच होतं'
Congress/ Shivsena/BJP
Congress/ Shivsena/BJPSaam TV

अमर घटारे -

मुंबई : काँग्रेसला पक्षनिष्ठा आणि एकनिष्ठता याच्याबद्दल काही घेणंदेणं नाही, काँग्रेस ही गद्दारांची फौज आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये हे घडणारच होतं अशी जहरी टीका भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी काँग्रेसवर केली आहे.

काल जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निकालामध्ये काही आमदारांची मतं फुटल्यामुळे काँग्रेसच्या (Congress) चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मविआमधील काही नेत्यांनी काँग्रेसला मदत केली नसल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आता भाजप (BJP) नेत्यांनी मात्र काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसला पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठता याच्या बद्दल काही घेणंदेणं नाही. काँग्रेस ही गद्दारांची फौज असून काँग्रेसमध्ये हे घडणारच होतं, काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे रणांगण सोडून नागपुरला गेले, त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार नाही. जोपर्यंत त्यांचे खिसे गरम होणार नाही तोपर्यंत काँग्रेस सरकार सोडणार नाही अशी टीका अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर केली आहे.

हे देखील पाहा -

तसंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नीतिमत्ता कळत असेल, नीतिमत्तेला धरून वागत असेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे असंही बोंडे म्हणाले आहेत.

आमदार फुटणं गांभिर्याने घेतलं आहे, दिल्लीला जाणार -

दरम्यान, विधान परिषदेत निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे विधान परिषदेचे विजयी उमेदवार भाई जगताप म्हणाले, काँग्रेसचे आमदार (MLA) फुटले, हे गांभीर्याने घेतल आहे. हा प्रकार सहन केला जाणार नाही, या बाबत उद्या दिल्लीला जावून पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करणार, त्यांच्या कानावर सर्व प्रकार घालणार असल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच मला शब्द दिलेले अपक्ष आमदार माझ्यासोबत राहिले पण आमच्याच आमदारांची मत फुटल्याने हांडोरे यांचा पराभव झाला असल्याचंही जगताप यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com