राज ठाकरेंना मुंबईच्या नेत्याचा इशारा, भाजपनं दिलं स्पष्टीकरण

मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती.
Raj Thackeray
Raj Thackeray SaamTvNews

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिंदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. आता राज यांच्या अयोध्या दौऱ्यावरूनही (Ayodhya) विरोधाचा सूर आवळला जातोय. उत्तर प्रदेशच्या भाजप खासदारानं राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता मुंबई भाजप (BJP) प्रवक्ते संजय ठाकूर (Sanjay Rathod) यांनीही राज यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत तगडं आव्हान दिलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी आणि त्यानंतरच अयोध्या दौरा करावा,असे भाजप प्रवक्ता ठाकूर यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलंय. मुंबई भाजप उपाध्यक्ष श्वेता परुळकर (Shweta Parulkar) यांनी ठाकूर यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलीय. संजय ठाकूर यांचे राज ठाकरे यांच्याबाबतचे वक्तव्य वैयक्तीक आहे. मुंबई भाजप संजय ठाकूर यांच्या मताशी सहमत नाही. असं परुळकर यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray
मुंबईच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या आवाजातील तिसरा टीझर आला, पाहा Video

परुळकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, संजय ठाकूर यांचे राज ठाकरे यांच्याबाबतचे वक्तव्य वैयक्तीक आहे. मुंबई भाजप संजय ठाकूर यांच्या मताशी सहमत नाही.राज ठाकरे यांनी माफी मागितल्यास स्वतः उत्तरप्रदेशात येऊन त्यांचे स्वागत करू,अशा आशयाचे पत्र मुंबई भाजपा प्रवक्ता संजय ठाकूर यांनी राज ठाकरे यांना लिहिले आहे. मात्र, संजय ठाकूर यांचे मत आणि त्यांची भूमिका वैयक्तीक असून पक्ष ठाकूर यांच्या मताशी सहमत नाही.

तसंच मुंबईचे भाजप प्रवक्ता उदयप्रताप सिंह यांनीही ठाकूर यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय ठाकूर यांचे वक्तव्य वैयक्तीक होते. त्यांच्या भूमिकेबाबत मुंबई भाजपचा काहीही संबंध नाहीय. असं उदयप्रताप सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपचे (BJP) उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनीही यापूर्वी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला होता.

Raj Thackeray
धक्कादायक! पोलिसानेच केला महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

त्यानंतर आता भाजपचे मुंबईतील प्रवक्ता संजय ठाकूर यांनीही अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी आणि त्यानंतरच राज यांनी अयोध्या दौरा करावा, असे ठाकूर म्हणाले.राज ठाकरे यांनी माफी मागितली तर मी लखनऊ विमानतळावर येऊन शेकडो वाहनांच्या ताफ्यासह त्यांना सुरक्षित आयोध्येत घेऊन जाईल, असेही ठाकूर म्हणाले. पण राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर, विरोध करणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com