नाना पटोले यांना मोदींवरील वक्तव्य भोवण्याची शक्यता; भाजप पटोलेंविरोधात आक्रमक!

पटोलेंच्या गावात मोदी नामक गावगुंडाचा शोध सुरु...
Nana Patole
Nana PatoleSAAM TV

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यात भाजप आक्रमक झालीय. भाजपनं (BJP) पटोले यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केलीय. नाना यांच्या वक्त्याव्याचे पडसाद केवळ राज्यातच नव्हे तर देशात उमटले आहे. त्यामुळं पटोले यांच्या अडचणी वाढणार असून त्यांना मोदींवरील वक्तव्य भोवणार असं दिसतंय.

हे देखील पाहा :

भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार रविवारी थांबला. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'आपण मोदी याला शिव्या देऊ शकतो आणि मारूही शकतो', अस वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झालीय.

Nana Patole
आदल्या दिवशी केले लग्न; दुसऱ्या दिवशी प्रेयसी म्हणाली लग्न अमान्य, प्रियकराने केले विषप्राशन!

भाजपनं राज्यभर आंदोलन करत पटोले यांच्या अटकेची मागणी केलीय. नाना पटोले यांच्या वर गुन्हे दाखल करावे यासाठी भाजपनं राज्यभर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. नागपूरात तर आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

नाना पटोले यांनी मात्र आपण आपल्या गावातील गावगुंड असलेल्या मोदी (Modi) बद्दल हे वक्तव्य केल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न ही त्यांच्या अंगलट आला. मोदी या गावगुंडांला पोलिसांनी अटक केल्याचेही नाना यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी (Police) अशा कुठल्याही मोदी नामक गावगुंडांला तांब्यात घेतलं नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळं नाना खोटं तर बोलत नाही नं अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Nana Patole
उदयनराजेंनी केले लुंगी घालून फोटो सेशन; 'पुष्पा' सिनेमातील गाण्यावर ठेका धरून उडवली कॉलर!

नाना यांच्या अटकेच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही ट्विट केलं. त्यामुळं नाना यांचे वक्तव्य दिल्लीपर्यंत पोहोचलंय. त्यामुळं याचे पडसाद काय उमटतात, नाना यांच्यावर पक्षश्रेष्ठी कारवाई करणार का, नाना यांना मोदी राग भोवणार का? हे पाहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com