भाजपने एमआयएमसह वंचितला १ हजार कोटी दिले: चंद्रकांत खैरे

एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि राणा दांपत्य या भाजपच्या एबीसीडी टीम आहेत, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.
Chandrakant Khaire
Chandrakant KhaireSaam Tv

औरंगाबाद: भाजपने लोकसभा निवडणुकीत एमआयएम (MIM) आणि वंचित बहुजन आघाडीला १ हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. आणि पक्षांना वाटप करण्यासाठी हा पैसा भाजपकडे आला कुठून असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थित केला. आज खैरे शिवसेनेच्या बैठकीनिमित्त जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका केली.

एमआयएम, वंचित बहूजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राणा दाम्पत्य या भाजपच्या एबीसीडी टीम असल्याची टीका खैरे यांनी केली. राणा दाम्पत्याने चप्पल घालून हनुमान चालीसा म्हटली म्हणून हनुमानाने त्यांना १४ दिवस जेलमध्ये पाठवून दिले, असंही खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने धोका दिला असून युतीचे नेते असताना रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत दवाखान्यात बसून मला धोका दिला. त्यामुळेच इम्तियाज जलील लोकसभेला औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडून आले असा आरोप देखील खैरे यांनी दानवे यांच्यासह भाजप (BJP)नेत्यांवर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com