मोठी बातमी! शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली?; मुख्यमंत्र्यांसोबतची भेट रद्द

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली लावली आहे
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSaam Tv

मुंबई : राज्याच्या राजकारणातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावली लावली असल्याची माहिती आहे. संभाजीराजे वर्षा बंगल्यावर जाण्यास नकार दिला आहे. संभाजीराजे शिवसेनाच (Shivsena) काय तर कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही. अपक्ष निवडणूक लढवण्यावर संभाजी राजे ठाम आहे. मुंबईतून पहाटेच ते कोल्हापूरला निघाल्याची सूत्रांची माहिती आहे. (Sambhaji Raje Chhatrapati Will Not Go To Varsha Bungalow)

Sambhajiraje Chhatrapati
"लाथ मारा अशा खासदारकीला"; निलेश राणे यांचं संभाजीराजेंना आवाहन

विशेष बाब म्हणजे रविवारी (22 मे) शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांचा समावेश होता. या तिन्ही नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना मातोश्रीचा निरोप दिला होता. उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधायला मातोश्रीवर या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना पाठवाला होता. मात्र, आता संभाजीराजे यांनी शिवसेनेचा हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती आहे.

संभाजीराजे छत्रपती सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणूनच उमेदवारी करणार असल्याचं समजतं आहे. संभाजीराजे यांना भाजपसह महाविकास घाडीतील आमदारांचा पाठिंबा आहे. संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला शिवसेनेतल्या आमदारांनेच विरोध केला आहे. संभाजीराजेंना विरोध राजकीय दृष्टा न परवडणारा असल्याने आमदारांचा पक्ष नेतृत्वाकडे विरोध न करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेंनी उमेदवारी करावी हा देखील पर्याय देण्यात आला आहे. संभाजीराजे यांच्याकडून मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे.

आज मुख्यमंत्र्यांची घेणार होते भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना वर्षा बंगल्यावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. संभाजीराजे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असल्याची चर्चा देखील होती. आज (सोमवार 23 मे) 12 वाजता संभाजीराजे छत्रपती वर्षावर जाणार होते. त्यामुळे संभाजीराजे हातात शिवबंधन बांधणार का अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, आता संभाजीराजे वर्षावर जाणार नसल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com