Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी; भंडाऱ्यातील चौथी घटना!

विशेष म्हणजे या परिसरातील वाघाच्या हल्ल्याची ही चौथी घटना असून एकाच वाघाने आता ४ लोकांना जखमी केल्याने गावात भीतीपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी; भंडाऱ्यातील चौथी घटना!
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी; भंडाऱ्यातील चौथी घटना!SaamTv

भंडारा : पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील लोभी जंगलात घडली आहे. रूपचंद मोनाजी सोनवाने (वय 55, रा.आष्ठी) असे जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. त्यांच्यावर नाकाडोंगरी आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. एकाच महिन्यात वाघाच्या हल्ल्याची हि चौथी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा -

तुमसर तालुक्यातील आष्ठी येथील रूपचंद मोनाजी सोनवाने हे नेहमी प्रमाणे गुरे चारण्यासाठी लोभी जंगलात गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या पट्टेपार वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या 15 मिनिटे चाललेल्या झुंझित सोनवाने यांच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली आहे.

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी; भंडाऱ्यातील चौथी घटना!
अकोल्यात MIM चे सेल्फी काढो आंदोलन..!

आरडाओरड केल्याने त्यांची वाघापासून सुटका झाली आहे. सोबतच्या गुराख्यांनी त्यांना नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या परिसरातील वाघाच्या हल्ल्याची ही चौथी घटना असून एकाच वाघाने आता ४ लोकांना जखमी केल्याने गावात भीतीपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com