Beed: खाकीतली सौंदर्यवती बनली मिस महाराष्ट्र; तरुणीचं सर्वस्तरातून कौतुक

आपलं कर्तव्य चोखपणे बजावून त्यांनी मॉडेलिंगच्या जगात आपला ठसा उमटवला. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या मॉडेलिंग स्पर्धेमध्ये, फस्ट रणर अप किताब मिळवत प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र झाल्या आहेत.
Beed News
Beed Newsविनोद जिरे

बीड- अनेक व्यक्ती जीवनात काय बनायचं यासाठी स्वप्न पाहतात, ते उराशी बाळगतात, मात्र तेच व्यक्ती स्वप्न पूर्ण करतात, जे कोणत्याही परस्थितीत कारण देत मागे हटत नाहीत, अगदी जिद्दीने प्रत्येक परिस्थितीवर मात करत पुढे पाऊल टाकतात आणि आपलं स्वप्न पूर्ण करतात. असंच स्वप्न शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बीडच्या (Beed) छोट्याशा गावातून आलेल्या तरुणीने पाहिलं व तिने एक कुस्तीपट्टू, पोलीस (Police) शिपाई आणि मिस महाराष्ट्र (Miss Maharashtra) पर्यंतचा प्रवास करत आपलं स्वप्न पूर्ण केलं.

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील मातावळी या अगदी छोट्याशा गावात प्रतिभा सांगळे राहतात. शेतकरी (Farmer) कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे यांनी लहानपणापासून आपलं ध्येय ठरवलं होतं. त्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात कुस्तीपट्टू राहिल्या आहेत. त्यांनी अनेक आखाडे, स्पर्धा गाजवल्या असून त्यांनी नॅशनलपर्यंत मजल मारली आहे. तर 2010 पासून त्या बीड पोलीस (Beed Police) दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्या आहेत. यावेळी आपलं कर्तव्य चोखपणे बजावून त्यांनी मॉडेलिंगच्या जगात आपला ठसा उमटवला. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या मॉडेलिंग स्पर्धेमध्ये, फस्ट रणर अप किताब मिळवत प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र झाल्या आहेत.

हे देखील पहा -

ही स्पर्धा जिंकणं हे मी स्वतःसाठी आव्हान ठेवलं होतं. कारण माझा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. आणि माझ्या जिल्ह्यामध्ये सौंदर्यस्पर्धा, फॅशन शो हे जिल्ह्यात जास्तीचे माहीत नाहीत. हे जिंकून मला दाखवायचं होतं, मुली देखील पुढं येऊ शकतात, आम्ही मुली कुठं कमी नाहीत. भले ही आपल्या जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा सिम्बॉल लागलेला असला तरी आपल्या जिल्ह्यात देखील हिरे आहेत. आपण कुठं कमी नाहीत.

हे ध्येय मी खूप दिवसांपासून उराशी बाळगलं होतं. 2020 मध्ये मिस महाराष्ट्र बनायचं ठरवलं होतं, मात्र लॉकडाऊनमूळ ते शक्य झालं नाही. तर याच लॉकडाऊनचा फायदा घेत मी प्रॅक्टिस केली. मी ड्युटी करून वाजता घरी यायचे, त्यानंतर जेवण करून दीड तास प्रॅक्टिस करायचे. आणि हे करत मी ठरवलं होतं येणारी स्पर्धा मला जिंकायची आहे आणि ती स्पर्धा मी जिंकलेय.

तर याविषयी मिस प्रतिभा सांगळे म्हणाल्या, की मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. प्रवास खूप सोप्पा नव्हता आणि अवघडही नव्हता. कारण मला स्ट्रगल करण्याची लहानलनापासून सवय असून मी एक कुस्तीपट्टू आहे. आज आनंद होत आहे.

Beed News
HBD Vamika Kohli: असाही योगायोग! मुलीच्या वाढदिवशी कोहली खेळणार सामना

मी खाकीत असून ते माझं कर्तव्य आहे, तर मॉडेलिंग हा माझा बालपणीपासूनचा छंद आहे. मिस महाराष्ट्र होणं हे स्वप्न होतं. मात्र जेवढं मला खाकीत भारी वाटतं तेवढं कुठंच वाटत नाही. कारण की मी खाकिमध्ये जेवढी सेफ आहे तेवढी इतरांना देखील ठेऊ शकते. खाकी म्हणजे माझं अन इतरांचं संरक्षण आहे.

तर आपली सहकारी मिस महाराष्ट्र झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यात देखील आनंद पाहायला मिळत आहे. वेळात वेळ काढून त्यांनी ही कला जोपासली हे खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी यापेक्षा पुढे जावे ही आमची इच्छा आहे.

दरम्यान गावखेड्यात आजही अनेक तरुण मुली, महिला या स्वप्न उराशी बाळगले असताना देखील परंपरा, चालीरीती आणि कुटुंबाच्या परस्थितीमुळे आपले स्वप्न पूर्ण करत नाहीत. मात्र या गाव खेड्यातील महिला आणि मुलींसमोर खाकीतील या सौंदर्यवती मिस महाराष्ट्र असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी एक प्रकारचा प्रेरणादायी आदर्श निर्माण करून दिलाय. त्यामुळे या खाकीतल्या मिस महाराष्ट्रातची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com