Beed: मुख्‍य मार्केटसह सर्व दुकाने बंद; मेटेंच्‍या निधनानंतर व्यापाऱ्यांचा दुखवटा

मुख्‍य मार्केटसह सर्व दुकाने बंद; मेटेंच्‍या निधनानंतर व्यापाऱ्यांचा दुखवटा
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे रविवारी सकाळी अपघाती निधन झाले. यामुळे बीड (Beed) शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून विनायक मेटे यांना व्यापाऱ्यांची आदरांजली वाहिली. मार्केट बंद असल्‍याने मुख्य मार्केटमध्ये देखील आज शुकशुकाट पहावयास मिळाला. (Beed News Vinayak Mete)

Beed News
घरकुल मिळत नसल्याने महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; यवतमाळ जिल्‍हाधिकारी कार्यालयातील प्रकार

लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यावर आज दुपारी चार वाजता बीड शहरातील सिद्धी विनायक पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा लाडका नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण जिल्हा शोक सागरात बुडाला आहे. यातच बीड जिल्ह्यातील व्यापारी महासंघाने सर्व दुकाने बंद ठेवून विनायक मेटे यांना आदरांजली वाहिली आहे.

व्यापाऱ्यांनी दुखवटा पाळला

बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोड, जालना रोड, माळीवेस,धोंडीपुरा, कारंजा रोड या सर्व ठिकाणची दुकाने बंद असल्याने मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. विनायक मेटे यांच्या जाण्याने बीड जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली असून दुःखवटा पाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आदरांजली पाहिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com