Beed : महाविकास आघाडी सरकारला कपिलधार कुठंय हेच माहीत नव्हत; अतुल सावेंची टीका

सुधीरभाऊंचा संकल्प आम्ही शिंदे - फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करणार - अतुल सावे
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला कपिलधार कुठे आहे ? हेच माहीत नव्हतं. त्यामुळे इथ विकास झाला नाही. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी या तीर्थक्षेत्रासाठी अकरा कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी चार कोटी दिले आहेत, मात्र त्यांचा हा संकल्प आम्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करू. असं आश्वासन बीडचे (beed) पालकमंत्री अतुल सावे यांनी कपिलधार येथे आयोजित शिवा संघटनेच्या मेळाव्यामधून दिले आहे.

Beed News
Pune : पुणेकरांनो पाणी जपून वापर; 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद

बीड परिसरात असणाऱ्या कपिलधार येथील मन्मथ स्वामी महाराजांच्या यात्रेचा उत्सव गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. याच यात्रा उत्सवा दरम्यान शिवा संघटनेकडून मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाच्या 27 व्या मेळाव्याला हजेरी लावत अतुल सावे यांनी तत्कालीन महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र कपिलधारच्या विकासासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार. असं आश्वासन सावे यांनी दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com