बीड - गेल्या तीन दिवसांपूर्वी थाटामाटात विवाह सोहळा झाला, त्यानंतर सोमवारी सत्यनारायणाची पुजा झाली. मात्र पूजानंतर एकीकडे पाव्हणेमंडळी जेवत असतांना दुसरीकडे शेतात जावून नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील मनाला चटका लावणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हे देखील पहा -
पांडुरंग रामकिसन डाके वय 26 असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील पांडुरंग रामकिसन डाके हा शेती करत होता. त्याचे शनिवारी माजलगाव येथे थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्याच्या सोळाव्याची सत्यनारायण पुजा देखील झाली.
सत्यनारायण झाल्यानंतर नातेवाईक व गावातील नागरिक घरी जेवण करत होते. यादरम्यान पांडुरंग हा जेवण करून कोणालाही न सांगता शेताकडे गेला. त्यानंतर शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पांडूरंगचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान मृतदेह काल सायंकाळी उशिरा शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात असून पांडूरंगने आत्महत्या का केली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या की घातपात? याचा पोलीस तपास करत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.