चढत्या तापमानाचा फटका; नागपुरात उष्माघाताचा दहावा बळी

राज्यात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक जणांचा बळी जात आहे.
auto rickshaw driver dies of heatstroke in Nagpur
auto rickshaw driver dies of heatstroke in NagpurSaam Tv

नागपूर : राज्यात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक जणांचा बळी जात आहे. हवामान विभागानं देखील पश्चिम विदर्भात उष्णतेचा इशारा दिला आहे. आता या कडक उष्णेताचा परिणाम नागपूरसहित (Nagpur) अनेक जिल्ह्यात बघायला मिळत आहे. या उकाड्याने नागरिक हैराण झालेला असताना नागपुरात उष्मघाताने (heatstroke) एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मृत्यूने नागपूरसहित विदर्भात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. (auto rickshaw driver dies of heatstroke in Nagpur)

हे देखील पाहा -

हवामान विभागानं पश्चिम विदर्भात गुरूवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यात उष्णेतेचा तडाखा बघायला मिळत आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भात उन्हामुळं आणि उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहे. यादरम्यान नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्येच मृतदेह आढळला आहे. सदर रिक्षाचालकाचा (Auto Driver) उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत रिक्षाचालकाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे उघडकीस आलं आहे, सदर माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरच्या मृत्यूने उष्माघाताने मृत्यू होण्याचा आकडा दहावर पोहोचला आहे. त्यामुळे नागपूरकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मे महिन्यात नागपूरसह विदर्भात उन्हाच्या तडाखा असाच कायम राहणार आहे, यामुळे विदर्भाच्या लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

auto rickshaw driver dies of heatstroke in Nagpur
Temperature: राज्‍यात जळगाव ठरले ‘हॉट सिटी’

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उष्माघातामुळे परभणीत एका शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. अचानक चक्कर आल्याने खाली कोसळून उष्माघातामुळे वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. दत्ता जाधव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव होते. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातही उष्माघाताने मृत्यू झाल्याचे प्रकरणं घडली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे विनाकारण दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com