भावकीचा वाद! 'संतोषला कायमचा ठार केला'; पोलीस स्टेशन गाठत हत्येची कबुली

संतोषचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर दिनेश याने थेट MIDC पैठण पोलीस ठाणे गाठत....
भावकीचा वाद! 'संतोषला कायमचा ठार केला'; पोलीस स्टेशन गाठत हत्येची कबुली
भावकीचा वाद! 'संतोषला कायमचा ठार केला'; पोलीस स्टेशन गाठत हत्येची कबुलीSaam TV

अविनाश कानडजे

औरंगाबाद : भावकीच्या वादातून चक्क कुऱ्हाडीने खून करण्यात आल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) पैठण तालुक्यातील बालानगरीत घडली आहेत. सत्तावीस वर्षीय युवकावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन खून केल्याची कबुली दिली आहे. संतोष भानुदास गल्हाटे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Aurangabad Crime News In Marathi)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, बालानगर येथील दारूच्या दुकानाच्या समोरील मैदानावर बुधवारी रात्री गावातील संतोष गल्हाटे आणि भावकीतील दिनेश भाऊसाहेब गल्हाटे यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणातून वाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दिनेश गल्हाटेने संतोषच्या डोक्यात, हातावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला जागीच ठार केले. संतोषचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर दिनेश याने थेट MIDC पैठण पोलीस ठाणे गाठंत मी संतोषला कायमचा खल्लास केला आहे, असे त्याने सांगितल्यावर पोलिसांनाच धक्का बसला.

यानंतर पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतले. जुन्या वादाच्या रागातून दिनेशने खुनाची कबुली दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांना घटनेची माहिती दिली. यानंतर तपासणीसाठी मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास एमआयडीसी पैठण पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com