याला प्रेम म्हणावे कसे... दोन मुलींचे टोकाचे पाऊल!

याला प्रेम म्हणावे कसे... दोन मुलींचे टोकाचे पाऊल!

अहमदनगर ः तुम्हाला आमच्याशी लग्न करावे लागेल, जर आमच्याशी लग्न केले नाही तर आम्ही तुमचे कोणाशीही लग्न होऊ देणार नाही. सुखाने जगूही देणार नाही.. अशा प्रकारची धमकी दोन मुलींना दिल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. त्या मुली अल्पवयीन होत्या. त्यांना दोन मुले सातत्याने त्रास देत होती. हे प्रकरण घरापर्यंत गेले होते. त्यांना समजही दिली होती.

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे ही घटना घडली. मुलांनी जिणेच हराम केल्याने दोन मुलींनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीवर शिरूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याला प्रेम म्हणावे कसे... दोन मुलींचे टोकाचे पाऊल!
गोल्ड व्हॅल्युअरमुळे अर्बन बँक मातीमोल

या बाबत माहिती अशी की, पिंपळनेर येथील या दोन अल्पवयीन मुली नुकत्याच दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या राळेगणसिद्धी येथे सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी पायी गेल्या होत्या. त्या परतत असताना वाटेत पिंपळनेर येथील दोन मुलांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या त्या मुलींची छेड काढली होती. तुम्हाला आमच्याबरोबर लग्न करावे लागेल. नाही तर आम्ही तुमचे लग्न इतर कोणाशीही होऊ देणार नाही, असा दम दिला होता.

या मुलांनी या मुलींची वाटेत छेडछाडही केली होती. या त्रासामुळे त्या दोघी दोन शांतच होत्या. मात्र, (ता. 29 ) त्या शेजारील मोकळ्या घरात अभ्यासासाठी गेल्या. दोघींनीही तेथेच दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विषारी औषध घेतले. ही बाब आम्हाला समजल्यानंतर त्यांना शिरूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यातील एक मुलगी मयत झाली. दुस-या मुलीवर उपचार सुरू आहेत.

अशा प्रकराची फिर्याद मयत मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. या पूर्वीही या मुलांनी अशाच प्रकारचा त्रास दिला होता. काही प्रतिष्ठीत लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या वडिलांना समजावून सांगितले होते. या फिर्यादीवरून मुलांविरोधात विनयभंग, छेडछाड तसेच बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर त्यांना रात्रीच अटकही झाली. एकतर्फी प्रेमातून ही मुलं त्यांच्यामागे लागली असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पदमने करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com