चंद्रकांत पाटलांची वक्तव्ये म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

अशोक चव्हाणांची चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका
चंद्रकांत पाटलांची वक्तव्ये म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!
चंद्रकांत पाटलांची वक्तव्ये म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!SaamTvnews

नांदेड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारने रखडवले असल्याची टीका आज केली होती. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांच हे वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं म्हटलं आहे.

हे देखील पहा :

50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही आणि हा विषय राज्याच्या अखत्यारितला नाही हे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले असताना चंद्रकात पाटलांनी राज्य सरकारने आरक्षण रखडवल्याचा शोध कुठून लावला असा उलट सवाल अशोक चव्हाण यांनी केलाय.

चंद्रकांत पाटलांची वक्तव्ये म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!
महिलेच्या अंगाला दगड बांधून खाडीत फेकले! विरारमधील घटना
चंद्रकांत पाटलांची वक्तव्ये म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!
औरंगाबादमध्ये स्क्वॅश खेळाच्या कोचला पळवून-पळवून चपलेने मारहाण! पहा Video

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर टीका करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्याचे लाड पुरवणारे सरकार असल्याची टीका केली. त्यावर कोण कुणाचा पुत्र, कुणाची पुत्री यात मला पडायचं नाही. मला राजकीय स्टेटमेंट पेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलणं योग्य वाटतं अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी नांदेड मध्ये दिलीय. चव्हाण आज नांदेड मध्ये बोलत होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com