जालन्यात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; डॉक्टर दापत्यासह मुलांना मारहाण!

पाठलाग करताना पोलीस ही जखमी...
जालन्यात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; डॉक्टर दापत्यासह मुलांना मारहाण!
जालन्यात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; डॉक्टर दापत्यासह मुलांना मारहाण!लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना:- जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर भागातील डॉ. हनुमान मारथा आणि विजय काकडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना आज सकाळी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

सशस्त्र आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत हा दरोडा टाकला. घरातील डॉ. हनुमान मारथा आणि विजय काकडे यांना शस्त्राचा धाक दाखवत घरातील कुटुंबियांना मारहाण करत सोने, चांदीच्या दागिन्यासह रक्कम आणि त्यांच्या मुलीच्या बी. एम. अस. च्या कागद पत्रासह पोबारा केला आहे.

जालन्यात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; डॉक्टर दापत्यासह मुलांना मारहाण!
15व्या वर्षी लग्न तर 16व्या वर्षी मातृत्व, उस्मानाबादेत बालविवाहाने घेतला जीव

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोराचा पाठलाग ही केला. मात्र या घटनेत पोलिस उपनिरीक्षक पल्हाद मदन हे ही गंभीर जखमी झाले आहेत. मात्र अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पसार झाले आहेत.,या सशस्त्र दरोडयाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com