मायणी मेडिकल कॉलेज गैरव्यवहार प्रकरण; आप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

महादेव देशमुख यांना देखील काही दिवसांपूर्वी इडीने अटक केली होती.
Appasaheb Deshmukh
Appasaheb Deshmukh Saam Tv

सातारा : मायणी मेडिकल कॉलेज गैरव्यवहार प्रकरणी आप्पासाहेब देशमुख यांना ईडीने (ED) अटक केली आहे. आप्पासाहेब देशमुख (Appasaheb Deshmukh) हे महादेव देशमुख यांचे बंधू आहेत. महादेव देशमुख यांना देखील काही दिवसांपूर्वी इडीने अटक केली होती. महादेव देशमुख आणि आप्पासाहेब देशमुख हे मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक आहेत.

याच मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आप्पासाहेब देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.

Appasaheb Deshmukh
चमत्कार कोणा बाबतीत घडतोय हे उभा महाराष्ट्र बघेल: अजित पवार

काय आहे प्रकरण?

मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून ऍडमिशनसाठी पैसे गोळ्या केल्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. कोल्हापूर येथी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेश सोसायटीला २०१२--१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याची परवानगी मिळाली होती. १०० जागांसाठी परवानगी मिळाली होती. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com