भर सभेत उपमुख्यमंत्र्यांनी मागितली पालकमंत्र्यांची माफी

Ajit Pawar
Ajit Pawar

सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूज येथील काेविड रुग्णालयाच्या उदघाटना प्रसंगी व्यासपीठावर भाषण करत असताना मी पाच वर्षे इथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले असे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी गडबडीत बोलल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांना त्यांची चूक चिट्ठी पाठवून लक्षात आणून देत जिल्हाधिकारी नव्हे तर पालकमंत्री असे हवे असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्याची हात जाेडून माफी मागत साहेब चुकलं असे म्हटले. ajit-pawar-inagurated-covid19-hospital-in-vaduj-balasaheb-patil-satara-marathi-news-sml80

Ajit Pawar
पर्यटकांनाे! कास पुष्प पठारात गव्यांचा कळप दिसल्यास 'हे' करा

शनिवारी वडूज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काेविड रुग्णालयाचे उदघाटन झाले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चूक निर्दशनास आणून दिली. त्यावर पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत जिल्हाधिकारी एवढं कुठं शिकलोय असे म्हणत खूप दिवसांनी एवढीशी चूक झाली मागे फार मोठी चूक झाली होती तेव्हा चव्हाण साहेबांच्या समाधी पुढे बसून साहेब चुकलं साहेब चुकलो असे म्हणालो असे पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान भाषणा दरम्यान चूक झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चूक निर्दशनास आणून दिल्याने त्यांच्याकडे पाहत हात जोडत साहेब चुकलं अस म्हणत चुकीची कबुली दिली. उपमुख्यमंत्री यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com