नंदुरबार आगारात कृती समितीतर्फे बेमुदत आंदोलन...

उद्या एसटी बस सेवा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता
नंदुरबार आगारात कृती समितीतर्फे बेमुदत आंदोलन...
नंदुरबार आगारात कृती समितीतर्फे बेमुदत आंदोलन...दिनू गावित

नंदुरबार - आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समिती द्वारे आज संध्याकाळपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे. दिवसभरातील प्रवासी फेऱ्या पूर्ण करून सायंकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी नंदुरबार आगारातील प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

बेमुदत उपोषणात एस टी चालक वाहक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे. जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा, नवापूर आगारातील आज दुपारपासून बस सेवा विस्कळीत झाली असून उद्या एसटी बस सेवा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नंदुरबार आगारात संध्याकाळपासूनच बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली असून उपस्थित कर्मचाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com