Pandharpur: 81 दिवसा नंतर ही एसटीचा संप सुरूच

पंढरपूर आगाराला आजपर्यंत 8 कोटींचा फटका
Pandharpur Bus Stop
Pandharpur Bus Stopभारत नागणे

पंढरपूर - 81 दिवसा नंतर ही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. या संपामुळे पंढरपूर आगाराचे आजपर्यंत सुमारे 8 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. राज्यातील प्रमुख असलेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) एसटी आगाराला सध्या दररोज 9 लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. एसटीचे उत्पन्न थांबल्याने एसटीचे (ST) चाक अधिकच रुतून बसले आहे. दरम्यान संपकरी कर्मचार्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन येथील आगार प्रमुख सुदर्शन सुतार यांनी केले आहे. (Pandharpur Latest News Update)

राज्यात पंढरपूर आगार हे प्रमुख म्हणून ओळखले जाते. राज्यभरातील भाविक एसटीने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येतात. त्यामुळे राज्यासह कर्नाटक,आंध्रप्रेदश, गुजरात,गोवा, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातूनही भाविक बसने पंढरपूरला येतात. येथील आगारातून एसटीच्या दररोज किमान दीडशे ते दोनशे फेऱ्या होतात. परंतु मागील 81 दीवसांपासून राज्यभरातील एसटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे एसटीची प्रवाशी वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्रावर मोठा परिणाम झाला आहे.

हे देखील पहा -

परिवहन विभागाने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ही अत्यंत तोकडा पडला आहे. त्यामुळे पावणे तीन महिन्यानंतरही येथील आगारातील शेकडो बस जागच्या जागी उभ्या आहेत. त्यामुळे आगाराचे दररोजचे सुमारे 9 ते 10 लाख रुपयांचे तर आता पर्यंत 8 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. सध्या आगारातून एसटीच्या दररोजच्या फक्त 12 फेऱ्या होतात. त्यातून आगाराला केवळ 1 लाखाचे उत्पन्न मिळत आहे. उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक होत असल्याने तोट्यात आणखी वाढ झाली आहे.

Pandharpur Bus Stop
धक्कादायक : सासू-सुनेचा वाद विकोपाला; चोरलेल्या पिस्तूलच्या गोळ्या झाडत सूनेनं केली सासूची हत्या

एसटीचे उत्पन्न बुडत असल्याने एसटीच्या संचित तोट्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान संपात सहभागी झालेल्या पंढरपूर आगारातील एकूण 60 कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये तब्बल 25 कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ केले तर 35 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटीची कारवाई टाळण्यासाठी कामगारांनी तत्काळ कामावर हजर व्हावे असे आवाहन ही आगार प्रमुख सुतार यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com