बलात्कार प्रकरणातील आरोपी पाेलिसांच्या हातून मुंबईत निसटला

Crime News
Crime News

पंढरपूर Crime News : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी वेळापूर पोलिसांना हिसका देवून बेडीसह पळून गेल्याची घटना मुंबईत बुधवारी घडली आहे. हा धक्कादायक प्रकार असून पाेलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा आज दिवसभर साेलापूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात रंगली आहे. accused-ran-away-mumbai-velapur-police-osmanabad-breaking-news-sml80

वेळापूर येथील एका अल्पवयीन मुलीस मुंबई येथे पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील मारूती नागनाथ माने यास वेळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली हाेती. या संशयित आराेपीस पुढील तपासासाठी वेळापूर पोलिस मुंबईला घेवून गेले होते.

Crime News
कापड दुकानात काम करणा-या मुलीचे अपहरण; २४ तासांत युवक जेरबंद

दरम्यान बुधवारी सायंकाळी तपास करताना माने याने पोलिसाच्या हाताला जोराचा हिसका देवून बेडीसह तेथून पळून काढला. आता पळालेल्या आराेपीचा शोधासाठी पुन्हा पाेलिसांची पथके रवाना झाली आहेत. याघटनेनंतर वेळापूर पोलिसांच्या व संबंधित अधिका-यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com