महिला स्पा सेंटर चालकासोबत जवळीक साधत बलात्कार, आरोपीला अटक

बंदुकीचा धाक दाखवत यासंदर्भात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देत असे.
Navi Mumbai
Navi Mumbai Saam TV

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई: एका महिला स्पा सेंटर चालकासोबत जवळीक वाढवत नंतर त्याच महिलेवर बलात्कार करत पैशांची मागणी करणाऱ्या एका इसमाला नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) बेड्या ठोकल्यात. गुरुपाल पाहुजा असे आरोपीचे नाव असून एक राजकीय संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. मागील 3 वर्षांपासून आरोपी गुरुपाल हा तक्रारदार महिलेसोबत बलात्कार करून तिच्या कडून वारंवार पैशांची मागणी करत होता.

तसेच बंदुकीचा धाक दाखवत यासंदर्भात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देत असे. आरोपी गुरुपालच्या या सर्व त्रासाला कंटाळून अखेर तक्रारदार महिलेने सानपाडा पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखिल तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी गुरुपाल पाहुजाला बलात्कार सह इतर गुन्ह्यात अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून नवी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com