खामगाव पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांच्या चलनी नोटा पकडल्या

या कारवाईत नकली आणि चलनी अश्या एकूण ६१ लाखांच्या चलनीनोटा पकडल्या आहेत.
खामगाव पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांच्या चलनी नोटा पकडल्या
खामगाव पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांच्या चलनी नोटा पकडल्या Saam TV

बुलडाणा : कारने नकली नोटा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी सिनेस्टाईलने पकडून अटक केली आहे. कुणाला तरी फसविण्यासाठी मोठी डील होणार असल्याची माहिती खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाल्यावरून खामगाव शहराजवळ सापळा रचून भरधाव जाणाऱ्या कारचा पाठलाग करून हि कारवाई केली. या कारवाईत नकली आणि चलनी अश्या एकूण ६१ लाखांच्या चलनीनोटा पकडल्या आहेत.

खामगाव पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांच्या चलनी नोटा पकडल्या
Breaking: मुलींचे लग्नाचे वय 18 वरुन 21 वर्ष केले; कॅबिनेटमध्ये मंजूरी

राष्ट्रीय महामार्ग 6 वर पोलीसांनी सापळा रचला व अकोला वरुन एमएच ३० एएफ ४२९५ ही कार नकली नोटा घेऊन येत असल्याची खात्री पटताच पोलीस पथकाने टेंभूर्णा फाट्यापासून कारचा पाठलाग सुरु केला. मात्र कार चालकाला पोलीस मागे लागल्याचे समजताच त्याने भरधाव वेगाने वाहन पळवीत बाळापुर नाका मार्गे शहरातील सुदर्शन चौकात एकास कारमधून उतरवून दिले. तर कार चालकाने भरधाव वेगाने कार घेवून बाळापूर फैल, रेखा प्लॉट, बर्डे प्लॉट मार्गे भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सती फैल, बर्डे प्लॉट भागातून कार सजनपूरी कडे नेत असताना एका दाम्पत्यास उडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीसांनी कारचा पाठलाग सुरुच ठेवित सदर कार शिरसगांव देशमुख परीसरात पकडून वाहन ताब्यात घेतले. तर दुसऱ्या आरोपीस नागरिकांनी पोलीसांच्या स्वाधिन केले.

अनिल भिकाजी हिरोळे वय 42 वर्ष रा. गजानन कॉलनी खामगांव आणि अशोक मोरे वय 59 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही खामगाव येथील रहिवासी आहेत. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या कडून त्यांच्या ताब्यातील टाटा विस्टा गाडी वाहन, व एकूण 11 हजार 775/- बनावट नोटा ज्याचे मुल्य 61,65,300 /- रु.चा माल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com