६ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार; ३० वर्षीय आरोपीस अटक!
६ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार; ३० वर्षीय आरोपीस अटक!Saam Tv

६ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार; ३० वर्षीय आरोपीस अटक!

मारेगाव तालुक्यातील मेंढणी आणि नवरगाव येथील बलात्कार व विनयभंग प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक बलात्काराची घटना

- संजय राठोड

यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील मेंढणी आणि नवरगाव येथील बलात्कार व विनयभंग प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक बलात्काराची घटना उघडकीस आल्याने मारेगाव तालुका या घटनेमुळे हादरला आहे. पहापळ येथील एका ३० वर्षीय विवाहित इसमाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन काही वेेळात आरोपीला जेरबंद केले आहे.

हे देखील पाहा :

सदर आरोपीने सहा वर्षाच्या पिडीत मुलीचे मंगळवारी (ता.१०) अपहरण केले होते. दरम्यान, आपली मुलगी अचानक गायब झाल्याने व दिसून येत नसल्यामुळे नातेवाईकांनी त्या मुलीचा शोध घेतला. मात्र, मुलगी सापडली नाही. पहाटेच्या सुमारास शेतामध्ये हि मुलगी आढळून आली. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला घरी नेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडित मुलीने कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. तद्नंतर नातेवाईकांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com