Beed : धक्कादायक! बीड जिल्ह्यात गतवर्षी 3 हजार 179 गर्भपात

964 महिलांचा गर्भपात हा विविध कारणांमुळे नैसर्गिक झाला आहे.
Beed
Beed Saam Tv

Beed Crime News : बीड जिल्हा अगोदरचं स्त्रीभ्रूण हत्यांमुळे बदनाम झालेला आहे. त्यामुळे एखादी महिला गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर तिच्याकडे संशयाने पाहिले जाते. मात्र गर्भ खराब असणे, बाळ व्यंग असणे आणि इतर वैद्यकीय कारणांमुळेही 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो.

Beed
Nitin Gadkari : बेळगावातून नितीन गडकरींना धमकीचा फोन; पोलिसांनी लावला कॉल करणाऱ्या 'त्या' गँगस्टरचा छडा

परंतु हा गर्भपात कायदेशीर आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. काही महिला नोकरी करायची आहे, आणखी करिअर बाकी, आताच बाळ नको, म्हणूनही गर्भपात करत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ही कारणे अधिकृतरित्या कागदावर घेतली जात नाहीत.

बीड (Beed) जिल्ह्यात मागील वर्षभरात 3 हजार 179 महिलांनी गर्भपात केला आहे. यात 12 आठवड्यापर्यंत 2 हजार 717 तर 12 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भ राहिलेल्या 462 महिलांचा समावेश आहे. 964 महिलांचा गर्भपात हा विविध कारणांमुळे नैसर्गिक झाला आहे. तर 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करणे हा स्त्रीचा हक्क असतानाही त्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. जिल्ह्यात यापूर्वी स्त्री भ्रूण हत्यामुळे जिल्हा बदनाम झाला आहे.

Beed
Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे दोघांचा मृत्यू; १२ जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा

त्यातच मागील वर्षी मुलगी नको म्हणून बकरवाडी येथे अवैध गर्भपात झाला. यामुळे आता गर्भपात करणाऱ्यांकडे आणखीनच संशयाने पाहिले जात आहे. परंतु केवळ मुलगी अथवा मूल नको म्हणूनच नव्हे तर इतर वैद्यकीय कारणांमुळेही गर्भपात केला जाऊ शकतो. यासाठी स्त्री रोगतज्ज्ञ आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे.दरम्यान 2021 वर्षी 3 हजार 903 गर्भपात करण्यात आले होते. त्या तुलनेत गतवर्षी 2022 मध्ये 724 ने गर्भपाताची संख्या घटली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com