नक्षलवादी असल्याचा धाक दाखवून प्रवाशांची लूटपाट.. !

बनावटी नक्षल्यांनी प्रवाशांना मारहाण करून 1 लाख 90 हजाराचा मुद्देमाल लुटला आहे. या घटनेनंतर सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्षलवादी असल्याचा धाक दाखवून प्रवाशांची लूटपाट.. !
नक्षलवादी असल्याचा धाक दाखवून प्रवाशांची लूटपाट.. ! अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया : नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील घनदाट जंगलातील दर्रेकसा मार्गावरील घटना घडली आहे. बनावटी नक्षल्यांनी प्रवाशांना मारहाण करून 1 लाख 90 हजाराचा मुद्देमाल लुटला आहे. या घटनेनंतर सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागात दहशतीचे वातावरण आहे. 1 lakh 90 thousand has been looted by beating the passengers

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत सालेकसा- र्देकसा मार्गावर 3 अज्ञात आरोपीनी रायपुर मध्यप्रदेश रहिवासी असलेले कारने प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना 3 लोकांनी  नक्षलवादी असल्याचे सांगून चाकूचा धाक दाखवून अंगावर असलेले सोन्याचे दागींने, मोबाइल, व नगदी लुटपाट केल्याची घटना खळबळजनक घडली आहे.

हे देखील पहा-

फिर्यादी व्यंकटराव सदाशिवराव ढोमने वय 71 वर्ष, रा. खुशालपुर रिंग रोड न.1 जिल्हा रायपुर (एम. पी.) यांच्या तक्रारीवरुन कलम 392, 34 अन्वये पोलीस स्टेशन सालेकसा येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे।

व्यंकटराव ढोमने, छन्नूलाल रोकडे, मालनबाई कारेमोरे, वाहन चालक नानेश्‍वर निनावे हे मारुती वैगनआर या वाहनाने सालेकसा-र्देकसा मार्गाने रायपुरकडे Raipur जात होते. रस्त्यावर असलेल्या शारदा मंदिरा जवळ 3 अज्ञात आरोपीनी कार थांबवली. आपन नक्षलवादी असल्याचे धाक दाखवून सर्वाना कार मधून उतरवून दूर नाल्याजवळ नेले आणि लाठी काठीने सर्वाना मारहाण केली.

नक्षलवादी असल्याचा धाक दाखवून प्रवाशांची लूटपाट.. !
पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हद्दीत अपघात; दोन ठार

एक छोटा चाकू दाखवून जीवाने मारण्याची धमकी देत फिर्यादीकडून 3 सोन्याच्या अंगठया, एक सोन्याची गोफ, 3 मोबाइल, 1200 रुपये रुपये नगदी असा एकुन 1 लाख 87 हजार 700 रुपयाचा ऐवज लुटून नेले. शहरात आल्यांवर ते नक्षलवादी नसल्याचे लक्षात येत पीड़ित व्यक्तिने याबाबत सालेकसा पोलिसात तक्रार दिली असुन पोलिस त्या वाटेमारूच्या शोधात आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com