Baramati Lok Sabha: कन्हेरीचा मारुती कोणाला पावणार? मारूतीच्या दर्शनानंतर शरद पवारांनी फुंकलं रणशिंग

Supriya Sule and Sunetra Pawar: पवार घराण्याचं एकहाती वर्चस्व राहिलेल्या बारामतीत यंदा आरपारची लढाई होत आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होत असल्यानं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv

Baramati Lok Sabha:

पवार घराण्याचं एकहाती वर्चस्व राहिलेल्या बारामतीत यंदा आरपारची लढाई होत आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होत असल्यानं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पवार कुटुंबीयांचं श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारूती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. कन्हेरी मारूतीच्या साक्षीने सुप्रिया सुळेंनी प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांनीच सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला.

बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरावर पवार कुटुंबीयांची प्रचंड श्रद्धा आहे. 1967 सालापासूनची ही परंपरा आजतागायत कायम आहे. लोकसभा निवडणूक असो की जिल्हा परिषद, शरद पवारांनी कायम कन्हेरी मारूतीच्या आशीवार्दानंच आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे.

Sharad Pawar
Hatkanangle Lok Sabha: हातकणंगलेत कोणाला हात, कोणाचा घात? मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका

शरद पवार यांनी 1967 साली पहिली आमदारकीची निवडणूक लढवली. त्यावेळेपासून मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. 1967नंतर जेवढ्या वेळी खासदारकी आमदारकीच्या किंवा अगदी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूका झाल्या, त्या प्रत्येकवेळी इथं नारळ वाढवूनच प्रचाराची सुरुवात केली गेली.

सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ कन्हेरी मंदिरात फोडून पवारांनी आजही ती परंपरा कायम ठेवली. कन्हेरीच्या मारुतीनं पवार कुटुंबाला भरभरून आशीर्वादही दिलेत. पवारांच्या काटेवाडी गावचाच हा एकेकाळी हिस्सा होता. पुढे ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन कन्हेरी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. परंतु तरीही पवारांचं गाव अशी ओळख काटेवाडीप्रमाणे कन्हेरीला आहे.

Sharad Pawar
Bhavana Gawali: मला उमेदवारी मिळू नये, म्हणून काही लोक फडणवीस - ठाकरेंकडे गेले होते; भावना गवळी यांचा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवारही कन्हेरी मारूतीचा आशीर्वाद घेऊनच प्रचाराचा शुभांरभ करणार आहेत. पवार घराण्याचं श्रद्धास्थान असलेल्या कन्हेरी मारूतीचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळेंनी प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. गेल्या 55 वर्षांपासूनची ही परंपरा पवार कुटुंबानं कायम ठेवली. बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार लढत होत आहे. त्यामुळे कन्हेरीचा मारूती यंदा कोणाला पावणार, हे पाहणं महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com