Temple : भारतातील 'या' ठिकाणाला 'मंदिरांचे साम्राज्य' अशी ओळख, प्रत्येकाची खासियतही वेगळी !

मंदिरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूमध्ये ४० हजारांहून अधिक मंदिरे आहेत.
Indian Temple
Indian TempleSaam Tv

Indian Temple : तामिळनाडू हे भारतातील दक्षिणेकडील राज्य आहे. एकीकडे समुद्र किनारा आणि हिल स्टेशन्स या ठिकाणाचे सौंदर्य वाढवतात, तर दुसरीकडे येथे बांधलेली हजारो भव्य मंदिरे या राज्याचे दर्शन घडवतात. येथील मंदिरांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील लाखो भाविक व पर्यटक रांगा लावत आहेत. राज्य हे पर्यटनाचे केंद्र आहे. येथील मंदिर पर्यटन आणि श्रद्धा या दोन्हींसाठी प्रसिद्ध आहे. मंदिरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूमध्ये ४० हजारांहून अधिक मंदिरे (Temple) आहेत.

बृहदेश्वर मंदिर -

तंजावर येथे असलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे भारतातील (Indian) सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान शंकराच्या त्रिनेत्र शिवलिंगासाठी आणि नंदी भगवानांच्या विशाल मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.

Indian Temple
Chinese Temple : अरेच्चा ! प्रसादात ठेवतात नूडल्स, चायनीज लोक करतात 'या' देवीची पूजा

मीनाक्षी मंदिर -

मदुराईमध्ये स्थित हे मंदिर माता पार्वतीच्या मीनाक्षी रूपाला समर्पित आहे. या मंदिरात अनेक मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. येथील मीनाक्षी तिरुकल्याणम महोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. यावेळी लाखो भाविक आणि पर्यटक येथे येतात.

नागनाथ स्वामी मंदिर -

हे मंदिर नागनाथ स्वामींना समर्पित आहे. या मंदिरात राहूची मूर्ती स्थापित आहे. ग्रह दोष दूर होण्यासाठी येथे भाविकांची गर्दी होते. येथील पुजार्‍यांच्या मते, भाविकांनी राहूला दुधाने स्नान घालताच दुधाचा रंग निळा होतो.

कुमारी अम्मान मंदिर -

हे मंदिर कन्या देवीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने या मंदिरात शिवाला प्राप्तीसाठी देवीच्या रूपात तपश्चर्या केली होती. नंतर भगवान परशुरामांनी या मंदिरात कन्या देवीची निळ्या दगडाची मूर्ती स्थापित केली.

रामनाथ स्वामी मंदिर -

रामेश्वरम बेटावर स्थित हे मंदिर भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. एका मान्यतेनुसार, भगवान रामाने रावणाचा वध केल्यानंतर भगवान शंकराची क्षमा मागण्यासाठी येथे शिवलिंगाची पूजा केली होती.

Indian Temple
Shirdi Sai Temple | साई मंदिरात ग्रहण पूजा, पाहा साई मंदिरातील दृश्य

कपालेश्वर मंदिर -

चेन्नई येथे स्थित हे मंदिर भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या मंदिरातील कोरीव काम आणि गोपुरमचे दगडी खांब आणि प्रवेशद्वार पर्यटकांना थक्क करतात. या मंदिराची वास्तू नजरेवरच बनलेली आहे.

श्रीपुरम सुवर्ण मंदिर -

वेल्लोरमध्ये स्थित हे मंदिर लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना समर्पित आहे. मालाकोडीच्या टेकड्या मंदिराला सौंदर्य देतात. हे मंदिर पूर्णपणे शुद्ध सोन्याचे आहे.

श्री रंगनाथ स्वामी मंदिर -

तिरुचिरापल्ली येथे स्थित हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिरात २१ भव्य मनोरे आहेत. त्यात आशियातील सर्वोच्च गोपुरम देखील आहे. हे मंदिर दिव्यदेशमच्या १०८ मंदिरांपैकी पहिले आणि सर्वात प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर पृथ्वीवर 'बैकुंठ' म्हणून ओळखले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com