Cleaning tips : घरातील या वस्तूंनाही ड्राय क्लीन करा

ड्राय क्लीनमुळे कपडे फक्त स्वच्छ होत नाही तर ते अधिक काळ टिकून राहतात.
dry cleaning tips in marathi
dry cleaning tips in marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बऱ्याचदा आपण आपले महागडे कपडे घरी धुण्याऐवजी ड्राय क्लीनला देतो. ड्राय क्लीनमुळे कपडे फक्त स्वच्छ होत नाही तर ते अधिक काळ टिकून राहतात. कपड्यांचे फॅब्रिक व त्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी आपण हाताने किंवा मशीनने धुण्याऐवजी ड्राय क्लीनला देतो.

हे देखील पहा -

आपल्या घरातील अनेक कानाकोपऱ्यात किंवा आपण वापरत असलेल्या रोजच्या वस्तूंमध्ये जंत असतात. आपण व्यस्त असल्यामुळे आपण घरातील या गोष्टींची टाळाटाळ करतो. परंतु, यामुळे आपण किंवा घरातील इतर सदस्य आजारी पडू शकतो. आपला वेळ (Time) वाचावा यासाठी आपण घरातील इतर वस्तुंना ड्राय किल्नच्या मदतीने स्वच्छ करू शकतो. (Dry cleaning tips in marathi)

घरातील या वस्तूंना ड्राय क्लीन करून घ्या

१. ब्लेझर आणि सूट कधीही हाताने किंवा मशीन धुलत्यास त्याचा आकार खराब होतो तसेच डिटर्जंटने धुतल्यास सूटची चमक आणि फिटिंग देखील खराब होऊ शकते. त्यासाठी त्याला ड्राय क्लीन करा.

dry cleaning tips in marathi
आर्थिक नियोजन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

२. आपल्या घरातील गाद्या लवकर घाण होतात. त्यांच्यावर साचलेली धूळ आणि माती अनेक प्रकारचे आजार किंवा संसर्गजन्य पसरवण्याचे काम करते. इतकेच नाही तर घरात पडलेले गालिचे किंवा गाद्या यात जंतू आणि बॅक्टेरिया जास्त असतात. अशावेळी आपण दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा गाद्या ड्राय क्लीनिंग करून घ्या.

३. आपल्या घरातील (Home) लिव्हिंग रूममध्ये ठेवलेला सोफा आणि कुशन वर्षातून एकदा ड्राय क्लीन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण त्याला नियमितपणे स्वच्छ (Clean) केले नाही तर त्यामध्ये बॅक्टेरिया आणि संसर्गाचा धोका वाढतो.

४. पडद्याचे फॅब्रिक खराब होणार नसेल तर ते आपण घरी सहज साफ करु शकतो. परंतु, जर पडद्यांचे फॅब्रिक जाड असेल तर ते लगेच खराब होऊ शकते. आपण काही महिन्यांनी त्यांना ड्राय क्लीन करणे आवश्यक आहे. असे केल्याने पडद्यांचा रंग फिका पडणार नाही आणि ते वर्षानुवर्षे नवीनसारखेच राहतील.

५. तसेच आपल्या घरात लेदर बॅग, लेदर जॅकेट, लेटर शूज आदी गोष्टी हमखास आढळून येतात. अशा वस्तूंना ड्राय क्लीन करणे आवश्यक आहे. असे न केल्यास त्यांच्यामध्ये बुरशीचा लागून ते खराब होतात.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com