पाणीदार काकडीचा चेहऱ्यासाठी कसा उपयोग होईल हे जाणून घ्या

तापमानाचा पारा अधिक उष्ण असल्यामुळे त्वचा तेलकट व चिकट होते.
Benefits of  cucumber, skin care problem
Benefits of cucumber, skin care problem ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ऋतुनुसार आपल्या शरीरात जसे बदल होतात तसे आपल्या चेहऱ्यावरही होतात. अधिक उष्णतेमुळे आपल्या मुरुमे आहे पुरळ (Pimples) येऊ लागतात. तापमानाचा पारा अधिक उष्ण असल्यामुळे त्वचा तेलकट व चिकट होते.

हे देखील पहा -

चेहरा (Skin) अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण रोज काही ना काही नवीन प्रयोग करत असतो पण, शरीरात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आहारात काकडीचा समावेश करतो. काकडी जितकी शरीरासाठी चांगली आहे तितकीच ती चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर ठरते. काकडीत असणाऱ्या गुणधर्मामुळे आपली त्वचा चमकदार आणि डागरहित ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक टोनरचा वापर करतो. त्यापैकी काकडीचा टोनर त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. काकडीचा टोनर कसा बनवायचा जाणून घेऊया.

१. काकडीचा टोनर बनवण्यासाठी आपण काकडीच्या रसात गुलाबजल मिसळवून त्याचा टोनर तयार करु शकतो. हे टोनर बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे आणि नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास फायदा होईल.

Benefits of  cucumber, skin care problem
मनुक्याचा आहारात समावेश करा आणि त्याचे अनेक फायदे मिळवा!

२. काकडीच्या रसात ग्रीन टीचा पावडर आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. हा टोनर आपण चेहऱ्यासाठी वापरु शकतो. तसेच आपण ग्रीन टी ऐवजी पुदिन्याचा देखील वापर करु शकतो.

३. काकडी आणि पुदिन्याचा टोनर बनवण्यासाठी काकडीचे गोल काप करुन थोडे पाणी घेऊन काकडीचे तुकडे आणि पुदिन्याची पाने मिक्स करा आणि हे पाणी फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी (Water) गाळून बाटलीत भरावे. हे टोनर दिवसातून दोनदा लावल्याने आठवड्यातून फरक दिसेल.

काकडीचे टोनर कसे लावायचे -

कापसाचा गोळ्यात तयार टोनर बुडवून चेहरा आणि मानेला लावावे. टोनर सुकल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा सिरम लावायला विसरू नका. त्वचा तेलमुक्त ठेवण्यासाठी हे टोनर दिवसातून दोनदा लावल्यास फायदेशीर होईल. जर टोनर लावल्यानंतर त्वचा कोरडी होत असेल, तर दोन दिवसांतून एकदाच टोनर लावावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com