काळपटलेले मोजे या घरगुती उपायांनी नव्यासारखे करा !

काळपटलेले मोजे साफ करण्यासाठी काही टिप्स.
Tips to clean white socks
Tips to clean white socksब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुले (Child) बाहेर खेळायला जातात त्यामुळे धूळ, माती आणि घामामुळे कपडे काळे आणि मळकट दिसू लागतात व ते साफही करता येतात. परंतु, काळपटलेले मोजे साफ करणे अत्यंत कठीण आहे.

हे देखील पहा-

पायात मोजे न घातल्यास बऱ्याचदा पायांचा दुर्गंध येऊ लागतो व त्यामुळे आपल्या पायांची सुंदरता कमी होऊ लागते. महागातले पावडर वापरून देखील मोज्यांवरील घाण साफ होत नाही आणि पांढरे मोजे अजूनच काळे पडू लागतात. कधीकधी मोजे आपण तेच तेच वापरतो त्यामुळे देखील ते काळे पडतात. काळपटलेले मोजे पुन्हा नवीन करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करणार आहोत ते जाणून घेऊया. (Tips to clean white socks)

या टिप्स फॉलो करा -

१. पांढरे मोजे स्वच्छ (Clean) करण्यासाठी आपण पाण्यात बेकिंग सोडा मिसळवून त्या पाण्यात मोजे भिजत ठेवा. काहीवेळा नंतर मोजे बाहेर काढून त्यांना घासून घ्या. डिटर्जंटमध्ये व्हिनेगर व बेकिंग सोडा मिसळा त्यात पुन्हा मोजे धुवा. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर मोजे पुन्हा पहिल्यासारखे होतील.

Tips to clean white socks
मसाल्याच्या राणीचा आरोग्यासाठी असाही फायदा!

२. मोजे उजळवण्यासाठी आपण लिंबाचा वापर करु शकतो. लिंबाचा रस आणि डिश साबण कोमट पाण्यात मिसळा. या पाण्यात मोजे टाकून हे पाणी उकळा यानंतर स्वच्छ पाण्याने मोजे धुतल्यानंतर ते काही अंशी नवीन होतील.

३. व्हिनेगरच्या मदतीनेही आपण मोजे स्वच्छ करु शकतो. पाणी उकळवून त्यात व्हिनेगर घाला. व यात मोजे रात्रभर भिजू द्या. त्यानंतर मोजे स्वच्छ पाण्याने धुवा.

४. मोज्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात (Water) ब्लीच आणि डिश सोप मिसळा. या मिश्रणात मोजे भिजत घालून काही वेळाने धुवा.

५. तसेच डिश डिटर्जंटच्या मदतीनेही आपण मोज्यांना पुन्हा उजळवू शकतो. यासाठी पाण्यात डिश डिटर्जंट मिसळून मोजे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मोजे धुतल्यानंतर त्यावरील डाग नाहीसे होतील.

अशाप्रकारे आपण काळपटलेल्या मोज्यांना पुन्हा नव्या सारखे करु शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com