पूजेच्या भांड्यांतील दिवा मिनिटांत कसा स्वच्छ कराल ?

अनेकदा घरात अशा काही वस्तू ठेवल्या जातात ज्या आपण नियमित वापरतो पण त्या व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही.
Cleaning tips, Kitchen tips
Cleaning tips, Kitchen tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पितळेच्या भांड्यांची काळजी घेताना कधीकधी आपल्या नाकी नऊ येतात. पण तरीही देखील आपण ते सांभाळण्याचे अथक प्रयत्न करत असतो.

हे देखील पहा -

अनेकदा घरात अशा काही वस्तू ठेवल्या जातात ज्या आपण नियमित वापरतो पण त्या व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही. त्यापैकी एक पितळेचा दिवा. व्यवस्थित साफ करुनही त्यावर असणारे तेलाचे डाग आणि त्याचा चिकटपणा जात नाही. दिवा हा आपल्या घरात नियमित वापरले जातात आणि त्यात असे अनेक भाग असतात, ते साफ केल्यानंतरही त्यात तूप किंवा तेल साठून राहते. हा दिवा वेळेत साफ केला नाही तर त्यात घाण साचून ती काळी दिसू लागते. हा दिवा नियमितपणे किंवा आठवड्यातून एक-दोनदा स्वच्छ केला तर त्याची चमक परत येईल. ते स्वच्छ (Clean) करण्याच्या सोप्या पद्धतींबद्दल जाणून घेऊया.

१. दिवा स्वच्छ करण्यासाठी आपण काही वेळे त्याला कोमट पाण्यात ठेवावे. काही वेळानंतर पाण्यातून बाहेर काढून अर्ध्या लिंबाच्या रसात मीठ घाला. हे मिश्रण लिंबाच्या सालीने दिव्याभोवती चोळून त्याच्या प्रत्येक भागात लावा. स्क्रबने दिव्याच्या सर्व भागांवर लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण लावा. थोडावेळानंतर पाण्याने (Water) स्वच्छ करा. जुना पितळी दिवा काही पुन्हा नव्यासारखा चमकू लागेल.

Cleaning tips, Kitchen tips
पांढऱ्या शूजला लागलेले डाग घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

२. आपण पितळेचा दिवा पुन्हा नवीन करण्यासाठी बेकिंग सोडा देखील लिंबू सोबत मिठाचा पर्याय म्हणून वापरू शकता. बेकिंग सोडा कोणत्याही साफसफाईसाठी योग्य एजंट म्हणून काम करतो. लिंबाच्या रसात चिमूटभर बेकिंग सोडा घेऊन त्यावर घासावे व पाण्याने स्वच्छ करावे.

३. चिंचेच्या कोळाच्या सहाय्याने आपण पितळेच्या दिव्याला नवी चमक देऊ शकतो. यासाठी चिंच पाण्यात अर्धा तास भिजत ठेऊन ती मऊ झाल्यानंतर चिंचेचा लगदा पितळेच्या दिव्यात सर्व बाजूने ठेवा. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवा. अशा प्रकारे पितळी दिवा काही मिनिटांत स्वच्छ होईल.

४. पितळेचा दिवा स्वच्छ करण्यासाठी, पाण्यात पांढरे व्हिनेगर घालून. या मिश्रणात दिवा काही वेळ बुडवून ठेवा. दिव्याच्या लपलेल्या भागातून तेल (Oil) आणि घाणही बाहेर पडताना दिसेल आणि दिवा स्वच्छ होईल.

५. पितळेचा दिवा स्वच्छ करण्यासाठी उकडलेल्या बटाट्याच्या पाण्यात दिवा थोडा वेळ बुडवून ठेवा. काहीवेळानंतर उकडलेल्या बटाट्याच्या पाण्यातून दिवा काढून त्यावर उकडलेले बटाटे चोळा नंतर पाण्याने धुवा दिवा उजळेल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com