इथे सर्वजण 100 वर्ष जगतात म्हणे; जाणून घ्या त्यामागचं सिक्रेट

दीर्घायुष्याचे रहस्य समजून घेण्यासाठी नॅशनल जिओग्राफिकचे लेखक डॅन बुटेन यांनी संशोधन केले.
इथे सर्वजण 100 वर्ष जगतात म्हणे; जाणून घ्या त्यामागचं सिक्रेट
इथे सर्वजण 100 वर्ष जगतात म्हणे; जाणून घ्या त्यामागचं सिक्रेट Saam TV

दीर्घायुष्याचे काही रहस्य आहे का?, एखादा खात्रीने म्हणेल नाही. पण जगात अशी एक नाहीतर पाच जागा आहेत जिथे 100 वर्षांपेक्षा जास्त लोक जगतात. याला ब्लू झोन (Blue zones) म्हणून ओळखले जाते. हा ब्लू झोन जगाच्या वेगवेगळ्या भागात आहेत. येथे राहणाऱ्या लोकांचे वय इतरांपेक्षा जास्त असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. याचे पुरावेही मिळाले आहेत. इथले लोक जास्त का जगतात यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. संशोधनातून अशा गोष्टी समोर आल्या आहेत की या ठिकाणांचा लोकांच्या दीर्घ आयुष्याशी काय संबंध आहे.

जगात ब्लू झोन कुठे-कुठे आहे?

ब्लू झोन जगातील 5 वेगवेगळ्या भागात आहेत. उदाहरणार्थ, मध्य अमेरिकेतील कोस्टारिकाचा निकोया भाग, इटलीचे सार्डिनिया, ग्रीसचे इकारिया, जपानचे ओकिनावा आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लोंबा लिंडा. बीबीसीच्या अहवालात असे म्हटले आहे की या भागांना प्रथम इटालियन महामारीशास्त्रज्ञ जियानी पेस आणि बेल्जियन लोकसंख्या तज्ञ मायकेल पॉलेन यांनी ब्लू झोनचे नाव दिले होते. त्यांनी ब्लू झोनवर एक पुस्तकही लिहिले आहे.

इथे सर्वजण 100 वर्ष जगतात म्हणे; जाणून घ्या त्यामागचं सिक्रेट
Nashik: महापालिका हद्दीतील म्हाडाच्या घरांमध्ये 1000 कोटींचा घोटाळा?

दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे?

दीर्घायुष्याचे रहस्य समजून घेण्यासाठी नॅशनल जिओग्राफिकचे लेखक डॅन बुटेन यांनी संशोधन केले. डॅनने त्याच्या संशोधनासाठी पाच ब्लू झोनचा अभ्यास केला आणि समजून घेतले. डॅनला कळलं की इथलं जीवन खूप वेगळं आहे. या पाच झोनमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये काही गोष्टी सामान्य असतात, तेच त्यांच्या दीर्घायुष्याचे कारण आहे.

पहिले रहस्य

इथले लोक नेहमी जेवढी भुक लागली आहे तेवढच खातात. त्यांच्या आहारात प्रामुख्याने नैसर्गिक गोष्टींचा समावेश असतो. जसे- भाज्या, शेंगा आणि फार कमी प्रमाणात मांस. येथील लोक शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम राहते. इथल्या लोकांना विशेषतः रताळे आणि टरबूज आवडतात. त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. उदाहरणार्थ, पोटॅशियम रक्तदाब कमी करते आणि फायबर पोट स्वच्छ ठेवते.

दुसरे रहस्य

येथील लोक जिममध्ये जाण्याऐवजी नैसर्गिक ठिकाणी व्यायाम करणे पसंत करतात. ते जेवढे अन्न खातात तेवढेच ते व्यायाम करतात हा एक त्यातला भाग आहे. त्यांच्यासाठी आहाराइतकाच व्यायाम महत्त्वाचा आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने अनेक आजार दूर राहतात.

तिसरे रहस्य

ब्लू झोनचे लोक केवळ शरीरावरच नव्हे तर मनाच्या आरोग्याकडेही पूर्ण लक्ष देतात. मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी बागकाम केले जाते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, डॅन बुएटनर यांच्या मते, येथील लोकांचा धार्मिक श्रद्धेवर खूप विश्वास आहे. लोमा लिंडाच्या रहिवाशांप्रमाणे ते सेव्हन्थ डे अॅडव्हेंटिस्ट चर्चचे अनुयायी आहेत. कोस्टा रिकाचे निकोया आणि सार्डिनिया, इटली येथे राहणारे कॅथोलिक ख्रिस्ती आहेत. त्याच वेळी, इकारियाच्या ग्रीक बेटावरील रहिवासी ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर विश्वास ठेवतात.

चौथे रहस्य

समूहात राहण्याची सवय त्यांना आनंदी आणि उत्साही ठेवते. ब्लू झोनमधील लोकांना सरासरी ७ तासांची झोप मिळते. त्याच वेळी, दिवसातून 30 मिनिटे तरी झोप घेतली पाहिजे. आपल्या शरीराकडे लक्ष देणे ही येथील लोकांची खासियत आहे, त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतात. त्याचा थेट सकारात्मक परिणाम त्यांच्या वयावर होतो. इथली जीवनशैली स्पष्टपणे दर्शवते की लोकांना दीर्घायुष्य का आहे. अशा सवयी दीर्घायुष्य वाढवतात हेही अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com