Menstruation Care Tips : मासिक पाळी सुरू होण्याआधी अनेक महिलांना या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याला 'प्री मेनस्ट्रुअल सिंड्रोम' PMS असे म्हणतात. तसे पहायला गेल तर मासिक पाळी येण्याआधी साधारण अस्वस्थता आणि मूड बदलणे सामान्य असले, तरी गंभीर लक्षणांना जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला मासिक पाळी (Menstruation) येण्याआधी असह्य वेदनांचा सामना करावा लागत असेत तर कदाचीत तुम्हाला "प्री मेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (PMDD)" असण्याची शक्यता असू शकते. जी पीएमएसच्या पुढची पायरी असू शकते. तेव्हा लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
हार्वर्ड स्त्रीरोगतज्ज्ञांनुसार, PMS आणि PMDD ची शारीरीक लक्षणे (Symptoms) सारखीच असतात. त्यात थकवा, सुजलेले स्तन, पाठ दुखी, डोकेदुखी, अन्नाची लालसा, पोटात गोळा येणे, बध्दकोष्ठता आणि अतिसार इत्यादींचा सामावेश होतो. पण, PMDD मध्ये चिंता, चिडचिड, नैराश्य, आणि निराशा यांसारखी भावनिक लक्षणे अधिक वाईट परीस्थितीत असतात.
PMDD रुग्णांना आत्महत्येची भावना देखील येऊ शकते. या कारणांसाठी PMDD हे मानसिक आजारांपैकी एक आहे. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांशी आपल्या लक्षणांबद्दल बोलून रोगाचे निदान करणे मदतीचे ठरते. त्याच बरोबर आपल्या लक्षणांचा आढावा घेत राहाण्यासाठी दैनंदिनी बाळगणे देखील फायदेशीर ठरेल.
PMDD होण्यामागची कारणं -
PMDD होण्यामागचे खरे कारण माहिती नसले तरी, जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या मते, ज्या महिलांना वैयक्तिक किंवा कौटुंबिक मानसिक (Mental) आजार/पोस्टपर्टम डिप्रेशन असते त्या महिलांना PMDD होण्याची शक्यता जास्त असते.
संशोधनानुसार, हा आनुवांशिक, हार्मोनल, न्यूरोकेमिकल आणि पर्यावर्णीय घटकांमळे उद्भवणारा आजार आहे. एस्टोर्जनमुळे आपला मुड आणि विचार यावर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या अनेक रसायनांवर परिणाम होतो. त्याच बरोबर मासिक पाळी येण्याआधीचे हार्मोनल बदल यांमुळे स्त्रियांमध्ये PMDD ची लक्षणे ट्रीगर होऊ शकतात.
त्याबरोबरच ताण आणि ट्रॉमा देखील PMDD होण्यामागे कारण ठरु शकतात. असे, जसलोक रुग्णालयातील एमडी सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ आणि यूएसच्या हार्वर्ड मेडिकल स्कूल माजी प्राध्यापिका डॉ. शामसाह सोनावाला यांनी सांगितले." डॉ. सोनावाला यांनी मेंदुतील सेरोटोनिन न्यूरोट्रांसमिशन नियंत्रित करणारे अँटी डिप्रेसंट PMDD असलेल्या महिलांना उपायकारक ठरतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.