लेदरच्या बॅगवरील डाग अशा पद्धतींनी साफ करा

हँडबॅग हे आजच्या काळात महिलांसाठी अधिकाधिक ट्रेंड बनत चालला आहे.
How to clean leather bags
How to clean leather bags ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलत्या जीवनशैलीनुसार बाजारात अनेक नवनवीन प्रकारच्या हँडबॅग आपल्या पाहायला मिळतात. ऑफिसपासून (Office) पार्टीपर्यंत आपण वेगवेगळ्या बॅग कॅरी करतो

हे देखील पहा-

हँडबॅग हे आजच्या काळात महिलांसाठी (Womens) अधिकाधिक ट्रेंड बनत चालला आहे. त्यामुळे स्त्रिया त्यांच्या पोशाखाप्रमाणेच दर्जेदार हँडबॅग कॅरी करण्यास प्राधान्य देतात. पण कधी-कधी आपल्या चुकीमुळे बॅगवर डाग पडतात. महागड्या बॅगवर डाग पडल्यामुळे आपण अनेक प्रकारचे उपाय करुन बघतो पण हँडबॅगवर डाग पडल्यानंतर त्याची काळजी कशी घ्याची, ती साफ कशी करायची व तिची चमक कशी टिकवून ठेवायची ते पाहूया.

अशी घ्या काळजी -

१. लेदरच्या बॅगवरील शाईचे डाग काढण्यासाठी आपण कापसाला अल्कोहोलमध्ये बुडवून घ्यावे. हा कापूस शाईच्या डागावर घासून ती जागा हवेत सुकू द्या. डाग निघण्यास मदत होईल.

How to clean leather bags
जुन्या व वापरलेल्या बेडशीटचा पुनर्वापर कसा कराल ?

२. लेदरच्या बॅगवरील ग्रीसचे डाग काढणे खूप सोपे आहे. कोरडे कापड घेऊन डाग लागलेल्या ठिकाणी पुसा ते सहज निघतील. तसेच ग्रीसच्या डागांना कधीही पाणी लावू नका हे लक्षात असू द्या.

३. आपल्याकडे जर पांढऱ्या रंगाची लेदर बॅग असेल, तर ती लगेच घाण होते अशावेळी आपण बॅग साफ (Clean) करण्यासाठी हेअरस्प्रेचा वापर करायला हवा. डाग लागलेल्या ठिकाणी हेअरस्प्रे करुन कापडाने पुसून घ्यावे.

४ तसेच लेदरच्या बॅगवरील डाग काढून टाकणे किंवा ते स्वच्छ करणे पुरेसे नाही. त्याची चमक देखील टिकवून ठेवणे अंत्यत महत्त्वाचे आहे. त्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी आपण व्हाईट व्हिनेगरमध्ये तेल घालून ते लेदर बॅगवर लावा व काही वेळाने पुसून घ्या बॅग पुन्हा नव्यासारखी होईल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com