24 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 24 ऑक्टोबर 2021 वार रविवार आजचे दिनमान
दिनांक  24 ऑक्टोबर 2021  वार  रविवार आजचे दिनमान
दिनांक 24 ऑक्टोबर 2021 वार रविवार आजचे दिनमान- Saam TV

आजचे दिनमान

मेष : मानसिक उत्साह वाढेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन : मनोबल वाढेल. जिद्द वाढेल. प्रॉपर्टीच्या कामाला दुपार नंतरचा कालखंड चांगला आहे.

कर्क : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. थोरामोठ्यांचे, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या : तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल.

तुळ : सध्या कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत.

वृश्‍चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

धनु : प्रवासात वस्तू हरविण्याची शक्यता आहे किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

मकर : खर्च वाढतील. आपण चुकीच्या व्यक्तींसाठी खर्च करत नाहीना याचा विचार करा.

कुंभ : सध्या कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. कामाचा ताण जाणवेल, दगदग जाणवेल.

मीन : शासकीय कामात यश लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार, फोन व गाठीभेटी होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com