निरव मोदीसाठी ऑर्थर जेलची विशेष कोठडी सज्ज

Special Cell Ready for Neerav Modi In Mumbai Aurthor Road Jail
Special Cell Ready for Neerav Modi In Mumbai Aurthor Road Jail

मुंबई  : फरार हिरे व्यापारी निरव मोदीच्या Neerav Modi प्रत्यार्पणाचा Extradition मार्ग इंग्लड England सरकारने मोकळा केला. या निर्णयामुळे निरव मोदीचे भारतातील प्रत्यार्पण जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे मुंबईत ऑर्थर जेलमधील विशेष कोठडी त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहे. पंजाब नॅशनल बँकेचे Punjab National Bank कोट्यवधीचे कर्ज बूडवून निरव मोदी मार्च २०१६ पासून परदेशात फरार झाला होता. Special Cell in Mumbai Aurthor Road Jail Kept ready for Nirav Modi

निरव मोदीला मुंबईला Mumbai आणल्यास त्याला ऑर्थर कारागृहातील Aurthor Road Jail बॅरक क्रमांक १२ मधील तीन विषेश कोठडीपैकी कोणत्याही एका कोठडीत ठेवण्यात येईल. या बराकची सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे. निरव मोदीला जेलमध्ये ठेवण्यासाठीची तयारी पुर्ण झाली आहे. निरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यास जेलची विशेष कोठडी त्याच्यासाठी सज्ज आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१९ मध्ये राज्याच्या Maharashtra कारागृह विभागाने Jail Department निरव मोदीच्या कोठडीसाठी केलेली विषेश तयारीची माहिती केंद्र सरकारकडे सादर केली होती.

निरव मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारताने एक मोठी कायदेशीर लढाई जिंकली आहे. भारतीय न्यायालयात न्याय मिळणार नाही, तुरुंगात चांगली व्यवस्था नाही असा युक्तीवाद निरव मोदीच्या वतीने केला गेला; मात्र कोर्टाने ते फेटाळून लावला होता. मार्च २०१९ पासून निरव मोदी लंडनच्या London तुरुंगात खितपत पडला आहे. त्याने जामीनासाठी अनेक अर्ज केलेच मात्र कोर्टाने ते फेटाळून लावले आहेत. इंग्लड सरकारच्या निर्णय़ानंतर आता केवळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाची औपचारीकता शिल्लक आहे. Special Cell in Mumbai Aurthor Road Jail Kept ready for Nirav Modi

अशी असेल कोठडी
१. बॅरक क्रमांक १२ मधील तीन कोठडीपैकी एक कोठडी मिळणार
२. खासगी वापरासाठी तीन चौरस मिटर जागा मिळेल
३. कॉटन चटई, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट दिले जाणार
४. या सेलमध्ये आवश्यक प्रकाश, वेंटीलेशन असेल
५. वैयक्तीत वस्तू ठेवण्यासाठी कपाट
६. कोठडीत तुलनेने इतर कैद्यांची संख्या कमी असणार
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com