सोलापुरात काँग्रेस नगरसेविकेनं सुरु केलं ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटर

Congress Corporator installed Container Covid Hospita
Congress Corporator installed Container Covid Hospita

सोलापूर:  सोलापूर Solapur शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने Corona थैमान घातले आहे. रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले आहे. शिवाय बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. गोरगरिबांना तर कुठेतरी उपचार  मिळावा यासाठी अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत आहे. सोलापूरात रुग्णांची वाईट अवस्था आहे. Solapur Congress corporator started Oxygen Container Covid Center

हे चित्र पाहून प्रभाग क्रमांक सोळा च्या काँग्रेस Congress पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल Firdos Patel प्रभागातील गरजू रुग्णांसाठी धावून आल्या आहेत. रुग्णांसाठी रस्त्याच्या कडेला कंटेनर कोविड सेंटर उभारले आहे. Solapur Congress corporator started Oxygen Container Covid Center

प्रभाग कोरोनामुक्त Corona Free करण्याचा उद्देश त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी गुरूनानक चौक परिसरातील ऑफिसर्स क्लबसमोर असलेल्या संस्मरण उद्यानाच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत  रुग्णांसाठी रस्त्याच्या कडेला कंटेनर कोविड सेंटर Covid Center उभारले आहे.

हे कंटेनर साधेसुधे नसून संपूर्ण वातानुकूलित असे आहे. याठिकाणी रुग्णांसाठी २४ तास डॉक्टर उपलब्ध असतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आठ बेडचे ऑक्सिजनयुक्त हे कंटेनर कोविड सेंटर आहे. हे येत्या सोमवारपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली. Solapur Congress corporator started Oxygen Container Covid Center

नगरसेवक फंडातून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून हे कोविड सेन्टर उभारण्यात आले आहे. या कंटेनर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना ऑक्सीजन सुविधा बरोबरच औषधगोळ्यासुद्धा मोफत देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या कालावधीत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने कोणाचा जीव जाणार नाही. यामुळे हे कंटेनर कोविड सेंटर उभारण्यात आल्याचे नगरसेविका यांनी सांगितले.

अमरदीप कंस्ट्रक्शनचे सलीम शेख यांनी अत्यंत कमी कालावधीत या कंटेनर हॉस्पिटलची Container Hospital निर्मिती केली आहे. दाटीवाटीने असलेली घरे आणि अन्य कारणांमुळे नागरिकांना कोरोनाचा Corona संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना अन्य मोठ्या रुग्णालयात उपचाराअभावी त्यांची हेळसांड होऊ नये. तसेच तातडीने त्या नागरिकाला उपचार मिळावेत यासाठी ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. Solapur Congress corporator started Oxygen Container Covid Center

प्रभाग क्रमांक १६ च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सुरू केलेल्या दोन वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटरमध्ये एकूण आठ Eight बेड आहेत. ज्यामध्ये चार बेड ऑक्सीजनयुक्त तर ४ बेड अन्य रुग्णांवर Patients उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. एका कंटेनरमध्ये ओपीडीसह OPD चार बेड तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ऑक्सीजन बेड तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी येणारे एम.डी.मेडिसिन डॉक्टर Doctors तसेच नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वातानुकूलित रूम तयार करण्यात आली आहे.

याशिवाय रुग्णांना टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था करण्यात अली आहे. गरम पाण्यासाठी गिझरचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. मुबलक पाण्याची व्यवस्था सुद्धा स्वच्छ टाक्यांच्या माध्यमातून आहे. दोन्ही कंटेनरमध्ये २४ तास चालेल अशी यंत्रणा बसविण्यात आली. तसेच चांगले  पंखेसुद्धा बसविण्यात आले आहेत. Solapur Congress corporator started Oxygen Container Covid Center

स्वच्छ प्रकाश यावा म्हणून एलईडी लाइट्स सर्वत्र लावण्यात आलेले आहेत. सोबतच ऑक्सिजनचे सिलेंडर Oxygen Cylinder ठेवण्यासाठी कंटेनरच्या बाहेर सुरक्षित असेल बॉक्स तयार करण्यात आला आहे. कंटेनरच्या बाहेरील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे. राहण्यासाठी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बाकडे टाकून दिले आहेत. विविध प्रकारच्या झाडांनी परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com