पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जवळची नाती आणि जीवाभावाची माणसं ही आता परकी होवू लागली आहेत. अशा संकट काळातही माणुसकी जपणारी नाती शिल्लक असल्याची प्रचिती काल पंढरपूर तालुक्यातील सांगवी गावात दिसून आली. Pandharpur Police Performed last rites of Senior Lady died of Corona
कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या आजीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातील कोणीच नसल्याने शेवटी करकंब येथील खाकी वर्दीतील पोलिसांनी त्या मृत आजीवर अंत्यसंस्कार करून माणूसकीचं दर्शन घडवले.
ही घटना काल (रविवारी) सांगवी (ता. पंढरपूर) येथे घडली. मृत आजीचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असल्याने सर्वजण पंढरपूर येथे विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल आहेत. त्यामुळे आजींच्या अंत्यविधीसाठी त्यांना जाता येईना. Pandharpur Police Performed last rites of Senior Lady died of Corona
गावात आजींच्या अंत्यविधीकरिता कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत करकंब पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे, सिरमा गोडसे, अमोल घुगे आदींनी पुढाकार घेऊन घटनास्थळी धाव घेतली. कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने त्यांनी मृताचे जवळचे नातेवाईक सून व जावई यांना बोलावून घेऊन त्यांच्या उपस्थितीत सर्व सोपस्कार पार पाडत स्वतःच अंत्यविधी उरकला.
Edited By - Amit Golwalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.