मुंबईच्या धारावीत कोरोनाचा थयथयाट, धारावी सील केल्यास काय होईल?

मुंबईच्या धारावीत कोरोनाचा थयथयाट, धारावी सील केल्यास काय होईल?

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोनानं अक्षरश: थैमान घातलंय. धारावीत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. झोपडपट्टीचा परिसर, प्रचंड गर्दी अशा अवस्थेत कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा यामुळे प्रशासनाची झोप उडालीय. त्यातच आता संपूर्ण धारावी सील करण्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र, धारावी सील करणं तितकं सोप्पं आहे का? हा प्रश्न उरतोच. कारण

पाहाा सविस्तर व्हिडीओ - 

सुमारे 576 एकरवर धारावीची झोपडपट्टी पसरलीय. इतक्या छोट्या क्षेत्रफळात तब्बल 10 लाख लोक राहतात. मुख्यत: धारावी हा झोपडपट्टीचा परिसर आहे. धारावीत बहुतांश अरूंद गल्ल्या, दाटीवाटीची घरं आहेत. धारावीत अनधिकृतपणे राहणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. छोट्या-छोट्या घरात 7 ते 10 लोकं राहतात. 
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग कसं शक्य होणार हा पेच प्रशासनापुढे उभा राहिलाय. त्यामुळे धारावी संपूर्ण सील करणं केवळ अशक्य असल्याचं अधिकारी सांगतायत.

कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न होतायत. सर्वांनी कोरोनाला पळवून लावण्याचा चंग बांधलाय. त्यामुळे प्रत्येकाने घरात बसून, सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाविरोधातल्या या लढाईत हातभार लावायला हवा.

Web Title - What will happen if the Dharavi is sealed by the coronation of Mumbai's Dharavi?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com