मातोश्रीचा दबदबा ओसरतोय, बाळासाहेबांच्या वेळचा दरारा कुठे गेला?

मातोश्रीचा दबदबा ओसरतोय, बाळासाहेबांच्या वेळचा दरारा कुठे गेला?

एकेकाळी मातोश्रीचा राजकारणात असलेला दबदबा आता हळुहळू कमी होत चाललाय. याच मुद्यावरून भाजप नेते आशिष शेलारांनीही ठाकरेंवर निशाणा साधलाय. मातोश्रीचा दबदबा ओसरतोय.? ठाकरेंचं स्पेशल स्टेटस लयाला जातंय?
बाळासाहेबांच्या वेळचा दरारा पडद्याआड होत चालंलाय? नेमकं कशामुळे ठाकरे घराण्याची पॉवर कमी होते आहे? पाहूया या सविस्तर विश्लेषणातून...

सध्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत नव्या राजकीय घरोब्याची तयारी चालवलीय. त्यासाठी बैठकांवर बैठका झडतायत. खुद्द उद्धव ठाकरे अशा बैठकांमध्ये सहभागी होतायत. मात्र या घडामोडींदरम्यान शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक महत्वाचा बदल होऊ घातलाय. आजवर शिवसेनेसोबत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायची असल्यास मातोश्रीवर हजेरी लावावी लागत असे. पण आता मात्र राजकीय चर्चांसाठी उद्धव ठाकरेंनाच मातोश्रीचा उंबरा ओलांडून बाहेर जावं लागतंय. 
सोमवारी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी वांद्रे येथील ताज लॅन्डस एन्ड या हॉटेल गाठलं. याशिवाय सोनिया गांधींशी चर्चेची गरज पडल्यास उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याचीही शक्यता आहे. नेमकी हीच बाब हेरून भाजपने शिवसेनेला डिवचलंय.

आजवर राजकीय किंवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या चर्चेसाठी प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, अरूण जेटली, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन एवढंच काय रजनीकांत आणि अमिताभ बच्चनसारख्या दिग्गजांनीही मातोश्रीवर हजेरी लावली होती. पण आता बदलत्या राजकीय वातावरणात नव्या राजकारणाची गरज म्हणून घडत असलेल्या घडामोडीत मातोश्रीचं हे स्पेशल स्टेटस लयाला जातय एवढं मात्र नक्की.

Web Title - Matoshree's power decreasing?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com