VIDEO |ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू होतोय की, ऑक्सिजन दरवाढीने

VIDEO |ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू होतोय की, ऑक्सिजन दरवाढीने

ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत. पण आता ऑक्सिजनच्या किंमतीनेच कोरोना रुग्णांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलीय.

राज्यभरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने पावलं उचलली असली तरीही ऑक्सिजनच्या अवाजवी विक्री दरावर मात्र कोणताही अंकुश लावलेला नाही. त्यामुळे पुरवठादारांनी जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी ऑक्सिजनच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. 

राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने ऑक्सिजनचे दर प्रति घनमीटर 17 रुपये 49 पैसे इतके निश्चित केलेत. पण वितरकांनी 25 रुपये घनमीटर या दराने ऑक्सिजनची विक्री सुरू केलीय. 
आतापर्यंत कंपनीकडून ऑक्सिजन 12 रुपये घनमीटर या किंमतीने विकला जात होता.  त्यामुळे वितरक 15 रुपये घनमीटर या दराने ऑक्सिजनची विक्री करत होते. पण आता खरेदी किंमतच 15 रुपयांवर गेल्याने किंमत वाढवल्याचा वितरकांचा दावा आहे. त्यामुळे 6250 रुपयांच्या 250 लिटर द्रवरूप ऑक्सिजन सिलिंडरची किंमत आता 9 हजार रुपयांवर पोहोचलीय. 

रुग्णांच्या या लुबाडणुकीची दखल घेत तातडीने पावलं उचलायची सोडून अद्याप आमच्याकडे तक्रारीच आल्या नसल्याची भूमिका घेत अन्न आणि औषध प्रशासनाने आपले हात वर केलेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या किंमती ऐकूनच रुग्णांना धाप लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com