परमबीरसिंग यांची चौकशी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्या; पोलिस महासंचालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Sanjay Pande - Parambir Singh.
Sanjay Pande - Parambir Singh.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Mumbai Police परमबीरसिंग यांची चौकशी अन्य अधिकाऱ्याकडून करावी, अशा आशयाचे पत्र राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे Sanjay Pande यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray  यांना लिहिले आहे. परमबीरसिंग यांनी आपल्यावर आरोप केले असल्याने त्यांची चौकशी मी करणे योग्य नाही, त्यामुळे ही चौकशी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावी, अशी विनंती पांडे यांनी या पत्रात केल्याचे समजते. Maharashtra DGP writes CM Uddhav Thackeray about Parambirsingh Probe

परमबीरसिंग Parambir Singh यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh हे गृहमंत्री असताना निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे Sachin Waze याला शंभर कोटींची वसूली करण्यास सांगत होते, असा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर राज्य सरकारने परमबीरसिंग यांनी पदाचा गैरवापर केल्याची चौकशी करण्याचे आदेश महासंचालक पांडे यांना दिले होते. मुंबई तसेच अकोल्यातील Akola काही पोलिस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर परमबीरसिंग यांनी चौकशी थांबविण्याबाबत याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे घ्यावी, यासाठी पोलिस महासंचालक पांडे आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. 

दरम्यान, अँटिलिया स्फोटक प्रकरणात Antilia Bomb Case अटकेत असलेले संशयित आरोपी सचिन वाझे, रियाज काझी यांना आता थेट सेवेतून बडतर्फे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.कलम ३११ अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे ही कारवाई करणार असल्याचं सांगितलं जातं. Maharashtra DGP writes CM Uddhav Thackeray about Parambirsingh Probe

दोघांच्या बडतर्फीचा अहवाल हा अंतिम टप्प्यात आहे. या संपूर्ण कटामुळे मुंबई पोलिसांची नाहक बदनामी झाली, असे कार्य अशोभनीय असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दोघांवर कोणत्याही क्षणी बडतर्फीची कारवाई होऊ शकते.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com