कसा आहे जळगावचा आखाजी झुला...वाचा खास अहिराणी भाषेत!

Jalgaon Akhaji Festival
Jalgaon Akhaji Festival

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं, कैरी तुटनी खडक फुटना झुय झुय पाणी व्हायवं, झुय झुय पाणी व्हाये तठे बांगड्यासना बजार वं...ह्या आणि अशा गणंच असली अहिराणी भाषा म्हाना गाणा आमना खान्देशमा आखाजीना दिन कानवर पडतथस. खान्देशमा आखाजी हाऊ सण बाया एकदम जोरमा साजरी करथीस. या सणले लगीन व्हयल पोरी माहेरले  येतीस. माहेरले येवानंतर त्या तिसन्या मैत्रींणीसमा झोका खेवामा रमी जाथीस. आणि झोकावर बठीसन मंग त्या आखाजीना गाणा म्हणतीस. चाला देखा मंग हाऊ आमना खान्देशमाना आखाजीवर पेशल रिपोट...Jalgaon Akhaji Zula Festival Ahirani Language

पहेले चुला आणि पोरेसोरे एवढंच काम बाईसले राहे. त्यामा बऱ्याच बाया शेतीकामाले जायेत. ) त्यामुये बाया माहेरनी याद आणि सासरना लोकेसनी तिले देयेल वागणूक गाणा म्हणीसन सांगेत.  खान्देशमा आजपण आखाजी सणले अहिराणीम्हा असा गाणा म्हणानी परथा कायम शे. आखाजीले  खान्देशाम्हा पोरीसले लेवाले मुराई म्हणजेच भाऊले बहिणले लेवासाठी तिना सासरले धाडतस. पोरगी माहेरले  उनी का ती गल्लीम्हा मोकीचोकी फिरस. तिन हाई मोकेचोके फिरणं आखाजीले जास्ती दिसस. खान्देशमा गगल्लोगल्ली तुमले सासरवास विसरिसन पोरी अश्या मोक्याचोक्या  झोकावर खेताना तुमले दिसतीन. 

हे देखिल पहा - 

आखाजीले पोर घर उनी का सगळं कटुंब आनंदी हुई जास. आखाजीना पहिला दिन कुंभारकडथाईन शंकर आणतस, गवराई मांडतस. आते हाई परथा थोडी कमी हुई गई. आखजिले वडवडीलेसनी आठवण करीसन मातीनी घागर पूजतस. लालमाटीनी  घागरवर डांगर, कुल्लई, पापड ठीसन पूजा करतस. बारा वाजानंतर पितरेसले आंबाना रस आणि पुरण पुईना निवत दखाडतस. Jalgaon Akhaji Zula Festival Ahirani Language

माहेरले एकदम जोरमा आखाजीना सण साजरा करानंतर पंधराएक दिनमा जवय पोर परत सासरना मुराईसोबत जास तवय आख्खं कुटुंब रडस. पोरबी मंग पुढना सणपर्यंत हाउ आनंद मनमा साठाईसन तेवढीच आनंदम्हा सासरले निंघी जास.

Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com