अकोल्यात कोरोनाचा कहर सुरूच; चोवीस तासांत ११५१ रुग्ण तर १५ जणांचा मृत्यु

Threat
Threat

अकोला: अकोला Akola जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा Corona कहर सुरूच आहे. रुग्णवाढीबरोबर मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात अकोल्यात ११५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल पंधरा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या दुसरी लाटेत Second wave कोरोना रुग्णाची संख्या अतिशय वेगाने वाढत चालली आहे. अकोल्यात दररोज नव्या रुग्णांची मोठ्या संख्येत भर पडत आहे. Corona havoc is continuously increasing in Akola

एप्रिल महिन्यात अकोलेकरांसाठी सर्वाधिक घातक ठरला आहे. या महिन्यात केवळ १८ दिवसात तब्बल १०७ रुग्णांना आपले प्राण कोरोना मुळे गमवावे लागले आहेत. आणि बाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढती आहे. इतकी भयानक परिस्थिती असताना देखील अकोल्यातील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. कोरोना बद्दल गाफील राहू नका लक्षणे असल्यास दुर्लक्ष न करता चाचणी करण्यचे आवाहन प्रशासनतर्फे Administration करण्यात आले आहे. 

एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू: 

एप्रिल April महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  तर मार्च महिन्यात ८६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र एप्रिलच्या १८ दिवसांतच तब्बल १०७ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे. 

जिल्ह्यातील आता सद्यस्थिती :

एकूण पॉझिटीव्ह अहवाल ३३७७० आहेत. मयत झालेली संख्या ५६० एवढी आहे. आत्तापर्यंत  २८४११ रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे . तर ॲक्टीव रुग्णसंख्या ४७९९ एवढी आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com