VIDEO | कोरेगाव-भीमा इथं उसळला भीमसागर

VIDEO | कोरेगाव-भीमा इथं उसळला भीमसागर

कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय..गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचीच सुरुवात ज्या लढ्यानं झाली, त्या लढ्याच्या आठवणींना पुन्हा जिवंत करण्याचा हा दिवस..केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी, चळवळीतले कार्यकर्ते 1 जानेवारीला हजेरी लावतात...

यंदाही असाच मोठा जनसमुदाय कोरेगाव-भीमा इथं जमला.. आपल्या लहान मुलांनाही आंबेडकरी अनुयायी आपल्या पूर्वजांचा शौर्याचा इतिहास दाखवण्यासाठी इथं जमले..राजकीय नेतेमंडळींनीही या विजयस्तंभाला अभिवादन केलं...

कोरेगावची लढाई म्हणून इतिहासात नोंद झालेल्या लढाईतील शूरवीर सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तंभ उभारला गेलाय..1 जानेवारी 1818 रोजी दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश सैनिक यांच्यात ही लढाई झाली..2 हजार सैनिकांसह बाजीराव पेशव्यानं पुण्यावर हल्ला चढवला..या सैन्याला ब्रिटिशांच्या 800 सैनिकांनी रोखलं..त्यात 500 महार सैनिक होते.भीमा नदीच्या काठावर ही लढाई झाली..ब्रिटिश अधिकारी फ्रान्सिस स्टँटनच्या नेतृत्वाखाली 12 तास ही झुंज चालली.या लढाईत पेशव्यांच्या सैन्यानं माघार घेतली..लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचे 834 पैकी 275 जवान कामी आले तर ब्रिटिशांच्या मते पेशव्यांचे 500 ते 600 जवान धारातीर्थी पडले..ब्रिटिशांनी विजयाचं प्रतीक म्हणून हा विजयस्तंभ उभारला..त्यावर धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावं आहेत..ही लढाई दलितमुक्तीच्या चळवळीतला महत्त्वाचा टप्पा मानली जाते..स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी विजयस्तंभाला अभिवादन केलं..या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षीच आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं इथं येतात..


या इतिहासाला 202 वर्ष होतायत..दोन वर्षांपूर्वी इथं झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय..

आंबेडकरी अनुयायांसाठी हा लढा आणि त्यातील महार सैनिकांच्या स्मृती  नेहमीच अभिमानाचा विषय राहिलाय आणि या स्मृती मानवमुक्तीच्या चळवळीसाठी कायम प्रेरणादायी ठरतील, हे नक्की..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com