Year Ender 2021: 'या' बायोपिक चित्रपटांना चाहत्यांनी घेतलं डोक्यावर

या चित्रपटांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
Year Ender 2021: 'या' बायोपिक चित्रपटांना चाहत्यांनी घेतलं डोक्यावर
Year Ender 2021: 'या' बायोपिक चित्रपटांना चाहत्यांनी घेतलं डोक्यावरSaam TV

आजकाल दिग्दर्शक बायोपिक बनवण्यावर भर देत आहेत. या वर्षी अनेक धमाकेदार बायोपिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातो. बायोपिक चित्रपटांमुळे लोक एकमेकांशी जोडले जातात. अशा परिस्थितीत या वर्षी कोणते सिनेमे रिलीज झाले ते जाणून घेऊया.

थलायवी (Thalaivi)

'थलायवी' चित्रपटात अभिनेत्री आणि राजकारणी जयललिता यांचा जीवनपट दाखवला आहे. चित्रपटात जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणात येण्याचा प्रवास दाखवला आहे. हा चित्रपट 10 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ए. एल विजय यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कंगना रानावतने जयललिता यांची भूमिका साकारली होती.

Year Ender 2021: 'या' बायोपिक चित्रपटांना चाहत्यांनी घेतलं डोक्यावर
महाराष्ट्रात दूध उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारचा 'मास्टर प्लॅन'

सायना (Saina)

सचिन तेंडुलकरप्रमाणेच सायना नेहवाल ही देखील एक अशी खेळाडू आहे जिने मुलांना खेळाची जाणीव करून दिली आहे. सायनाची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. तिच्यावर बनवलेल्या बायोपिकचे नाव 'सायना' असून त्यात परिणीती चोप्राने मुख्य भूमिका साकारली आहे. या अभिनेत्रीने सायनाची व्यक्तिरेखा पडद्यावर उत्तमरित्या साकारली आहे. हा चित्रपट Amazon Prime वर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 26 मार्च 2021 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ता यांनी केले होते.

सरदार उधम (Sardar Udham)

'सरदार उधम' हा या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. सरदार उधम हा स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम सिंग यांच्यावर बायोपिक आहे. त्यांची देशभक्ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

शेरशाह (Shershah)

शेरशाह हा देखील देशभक्तीवरचा चित्रपट आहे. या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्राचे देशप्रेम आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेम दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रांची भूमिका साकारली होती. त्याच वेळी, त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणीने साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

द बिग बुल (The Big Bull)

'द बिग बुल' हा स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित फायनान्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन हर्षद मेहताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इलियन डिक्रूझ, राम कपूर, सौरभ शुक्ला यांच्यासह अनेक कलाकार होते. कोरोनामुळे चित्रपटगृहांऐवजी डिस्ने हॉट स्टारवर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 8 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित झाला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com